
Nashik judge dismissed News : नाशिकमध्ये कार्यरत जिल्हा न्यायाधीश यांना आज(११ एप्रिल) पदमुक्त करण्यात आले. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे पथक नाशिकला दाखल झाले होते. त्यांनी ही कारवाई केल्याचे बोलले जाते. या कारवाईने न्यायालयात एकच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू झाले आणि कामकाज सुरू होताच एक मोठा निर्णय झाला. मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी घेतलेल्या या निर्णयाने सबंध जिल्हा न्यायालयात एकच खळबळ उडाली. दिवसभर तो चर्चेचा विषय होता.
जिल्हा न्यायाधीश (६वे) आर. आर. राठी हे सकाळी दहा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित झाले व त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी निरोप पाठवून बोलवून घेतले आणि त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांच्या काही न्यायालयीन निवाड्यांबाबत तक्रारी होत्या. जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या निकालांचा गोषवारा आणि पडताळणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करीत असतात. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींचेही अवलोकन केले जाते. जिल्हा न्यायाधीश राठी यांच्या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी याबाबतची कार्यवाही झाली होती.
नियमित प्रक्रियेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या पथकाने न्यायाधीश राठी यांच्याबाबत चौकशी केल्याचे कळते व त्यानंतर ही कारवाई झाली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जिल्हा न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचे पत्र पाठविले होते. त्यानुसार ही कार्यवाही झाली.
जिल्हा न्यायाधीश राठी यांच्याबाबत काही तक्रारी होत्या किंवा कोणती कारवाई झाली आणि कोणते प्रकरण होते याबाबत दिवसभर जिल्हा न्यायालयात चर्चा सुरू होती. या कारवाईने न्यायालयात दिवसभर खळबळ उडाली. कल्याणमध्ये त्याबाबतची चर्चा सुरू होती. जिल्हा न्यायाधीश राठी यांच्यावरील कारवाईचे तत्कालिक कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.