Nashik Crime : वारंवार गुंगारा देणारा ‘पुष्पा’ अखेर जाळ्यात; नाशिक न्यायालयाच्या आवारातच वनपथकाने ठोकल्या बेड्या

Nashik Wood Smuggler Arrested : वनविभागाच्या पथकाला वारंवार चकवा देणारा कुख्यात लाकडू तस्कर अखेर मोठ्या शिताफीने वनपथकाच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक न्यायालयाच्या आवारातच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
Nashik wood smuggling
Nashik wood smugglingSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गुजरात सीमेवरील हरसूल, पेठ परिसरात खैराच्या झाडांची अवैध तोड करून लाकडांची तस्करी करणारा कुख्यात लाकूड तस्कर जो वनविभाच्या पथकाला वारंवार गुंगारा देत होता तो अखेर वनपथकाच्या जाळ्यात अडकला. तेही नाशिक न्यायालयाच्या आवारातच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

कुख्यात लाकूड तस्कर संशयित शैलेश हेदुले याच्यासह त्याचा साथीदार संशयित परवेजभाई ओझरिया या दोघांच्या शोधात असलेल्या प्रादेशिक पश्चिम वनविभागाच्या पेठ व हरसूलच्या वनपथकांनी शनिवारी (दि.७) दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सापळा रचून शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.

नाशिक पश्चिम वनविभागातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ आणि बा-हे परिसरातील जंगलात रात्रीच्या वेळी खैराची झाडे तोडून ती गुजरातमध्ये तस्करीने पाठविण्याचा अवैध व्यवसाय करणारा शैलेश हा वनविकास महामंडळाने दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्यांचे पथकदेखील त्याचा शोध घेत होते.

Nashik wood smuggling
Ramdas Athawale : रामदास आठवले हे काय बोलून गेले ; म्हणे, 'मी सोबत आहे तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील'

हरसूल येथील काकडपाना–कसोली रस्त्यावर खैराच्या लाकडांची तस्करी करणारी एक जीप वनपथकाने ताब्यात घेतली होती. त्या जीपच्या चालकाची प्राथमिक चौकशी केली असता शैलेशचे नाव समोर आले. त्यानंतर हरसूल–पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे यांनी ही माहिती सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार वनपरिमंडळ अधिकारी कृष्णा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अमित साळवे, हर्षल गावित, शशिकांत भोये, ज्ञानेश्वर शिंदे, मनोहर भोये, गजानन कळंबे, हेमंत चौधरी, महेश पखाने, उमेश मेघा, रामदास गवळी आणि नामदेव कुंदे यांच्या पथकाने जिल्हा न्यायालय परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित शैलेश त्याच्या एका साथीदारासह तेथे येताच वनपथकाने शिताफीने कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेऊन वाहनात बसवले.

Nashik wood smuggling
Top 10 News: मुख्यमंत्र्यांची विधानसभेतच सर्वात मोठी घोषणा, ठाकरेंचा दणका,IAS मुंढेंच्या रडारवर सांगलीनंतर रायगड, पार्थ पवारांना आईचा मोलाचा सल्ला

त्यालाही हरसूल परिसरातील खैराच्या लाकडांच्या तस्करीप्रकरणी सहआरोपी करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गुजरातमधील वलसाड व डांग जिल्ह्यातील जंगलांमध्येही तो अशाच प्रकारच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. या प्रकरणात गुजरात वनविभागाचे पथकही त्याच्या मागावर होते; मात्र तो वारंवार दोन्ही विभागांच्या पथकांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता.

हरसूलमधील दलपतपूर येथून शैलेश (जीजे १५, सीडी २३१८) क्रमांकाच्या कारने नाशिक जिल्हा न्यायालयात आला होता. त्याच्यावर हरसूल प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथक आणि ‘एफडीसीएम’चे फिरते पथक सतत लक्ष ठेवून होते. वाहनाचा पाठलाग करत त्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आवारात दबा धरून बसलेल्या पेठ वनपरिक्षेत्राच्या पथकाने योग्य संधी साधत त्याच्या मुसक्या आवळल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com