Nashik Graduate Constituency: पदवीधरमध्ये नवा ट्विस्ट; नाशिकमध्ये शुभांगी पाटलांना वंचितचे आव्हान..

वंचित आघाडीने ही नाशिक पदवीधर मतदारसंघात रतन बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे
Shubhangi patil, Ratan Bansode
Shubhangi patil, Ratan Bansodesarkarnama
Published on
Updated on

Nashik Election News : नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत आपला उमेदवार दिला आहे. वंचितचा उमेदवार हा एकमेव राजकीय पक्षाचा उमेदवार असून इतर सर्व उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ठाकरेंची डोकेदुखी वाढवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ठाकरे आणि वंचितची आघाडी झाल्यानंतरही ही उमेदवारी कायम आहे.

वंचित आघाडीने ही नाशिक पदवीधर मतदारसंघात रतन बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तर शुभांगी पाटील या आधी अपक्ष उमेदवार होत्या. पण सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी नंतर शुभांगी पाटील यांना पांठिबा दिला आहे. यामुळे आता ही लढत तिरंगी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Shubhangi patil, Ratan Bansode
Telangana Politics : राज्यपालांशी वाद विकोपाला; मुख्यमंत्री ध्वजारोहणालादेखील आले नाहीत

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी युती केल्यानंतरही बनसोड यांची उमेदवारी कायम आहे. शिवसेनेसोबत युती केली. तर शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर मतदारसंघात आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केला आहे.

याबाबत ठाकरे गटाशी युती करण्याआधीच वंचितकडून अधिकृत उमेदवार देण्यात आली होती. असे स्पष्टीकरण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. या निर्णयामुळे मात्र शुभांगी पाटील यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका पाटील यांनाच बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Shubhangi patil, Ratan Bansode
Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे अडचणीत? भाजपने पाठिंबा दिल्याचा संभाजीराजेंच्या उमेदवाराचा दावा

दरम्यान, प्रचाराच्या शेवटचा टप्पा असतानाही भाजप आणि शिंदे गटाने अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे यातील सस्पेन्सही वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट आपल्यालाच पाठिंबा देतील असा दावा स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. उद्या (२८ जानेवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि संभाजीराजे छत्रपती आणि देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून फडणवीस आणि भाजप नेत्यांशी बोलणी सुरू आहे. भाजप आम्हालाच पाठिंबा देईल, असं स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही तासात नाशिकमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com