Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे अडचणीत? भाजपने पाठिंबा दिल्याचा संभाजीराजेंच्या उमेदवाराचा दावा

Satyajeet Tambe: निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊनही भाजपने तांबेंना अद्यापही पाठिंबा जाहीर केलेला नाही.
Satyajeet Tambe-Devendra Fadnavis-Sambhaji Raje
Satyajeet Tambe-Devendra Fadnavis-Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मतदानासाठी अवघे तीन दिवस राहिलेले असताना नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसऐवजी (Congress) अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना भारतीय जनता पक्षाचा (BJP) पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊनही भाजपने तांबेंना अद्यापही पाठिंबा जाहीर केलेला नाही. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati SambhajiRaje) यांच्या स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाचा आपल्यालाच पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचे काय होणार, अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Sambhaji Raje's candidate claims that BJP supported in Nashik graduate constituency)

नाशिक पदवीधर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी आणि एबी फॉर्म दिला होता. मात्र, काँग्रेसची उमेदवारी झुगारून डॉ. तांबे यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तोही अपक्ष. त्यानंतर काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली असून त्यांना पाठिंबा देणारे नगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्यासह नगरची काँग्रेस कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली आहे.

Satyajeet Tambe-Devendra Fadnavis-Sambhaji Raje
India Today-C Voter Survey : देशात आठव्या स्थानी; मात्र, महाराष्ट्राच्या जनतेची पसंती मुख्यमंत्री शिंदेंना मिळेना!

एकीकडे तांबे पिता-पुत्र काँग्रेसपासून दूर जात असताना भाजप मात्र ‘वेट आणि वॉच’च्या भूमिकेत दिसून येत आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या पद्धतीने तांबे यांना मदत करतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप तरी तसे चित्र दिसत नाही. दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनेही नाशिकमध्ये आपला उमेदवार उतरवला आहे. त्यांच्या संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी आपल्याला भाजपचा आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे. संभाजीराजेंच्या माध्यमातून भाजपशी आमची बोलणी सुरू आहेत, असेही स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते किरण गायकर यांनी सांगितले आहे, त्यामुळे तांबे गटात खळबळ उडू शकते.

Satyajeet Tambe-Devendra Fadnavis-Sambhaji Raje
Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपच्या पाठिंब्याबाबत विचारले असता, तेही या मुद्यावर मौन बाळगून आहेत. महाविकास आघाडीने आपली ताकद शुभांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली आहे. त्यामुळे भाजपचा पाठिंबा कदाचित संभाजीराजेंच्या उमेदवाराला मिळाला तर सत्यजित तांबे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे नाशिकमध्ये तांबे यांचे काय होणार, असा सवाल विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com