Nashik Hit & Run Case : मद्यपी चालकाला पोलिसांच्या सहानुभूतीचे गौडबंगाल काय?

Apathetic Police Continue To Rescue The Accused : मध्यरात्री घरात वाहन घुसविणाऱ्या मद्यपी चालकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
Nashik Accident News
Nashik Accident NewsSarkarnama

Nashik Police News : पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन केस प्रकरण ताजे असतानाच नाशिकच्या पोलिसांनीही तेवढाच बेदरकारपणा दाखवत एका मद्यपी चालकाला वाचविण्यासाठी आटापिटा चालविला आहे.दोन आठवड्यांपूर्वी एका मद्यपी चालकाने आपली कार थेट एका घरात घुसवली त्यात तिघे गंभीर जखमी झाले मात्र पोलिसांनी अद्यापही या चालकाला अटक केलेली नाही.

या घटनेला होऊन दोन आठवडे झालेले आहेत. तसेच या मद्यपी चालकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने (Court) फेटाळला असतानाही नाशिक पोलिस या आरोपी चालकाला का अटक करत नाहीत? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. पोलिस जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका केली जात असून या प्रकरणाची उलटसुलट चर्चा आता नाशिकमध्ये सुरु झाली आहे.

Nashik Accident News
Attack On Shiv Sena Leader : शिवसेना नेते बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला; गाडीत नसल्याने कोकणे बचावले

दोन आठवड्यापूर्वी नाशिक येथील शिवाजीनगर भागात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमाराला अती मद्यसेवन केलेल्या एका चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी थेट एका रो हाऊसमध्ये शिरली. त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले.

सुरेश भदाणे (60), कलाबाई भदाणे (58) आणि पृथ्वी सुरज सूर्यवंशी (6) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला. हा अत्यंत गंभीर गुन्हा होता. सुदैवाने यातील जखमींचे प्राण वाचले.

चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याने तो गंभीर गुन्हा आहे. मात्र पोलिसांनी (Police) त्याला अद्यापही अटक केलेली नाही. या तपासाबाबत पोलिसांची चालढकल सुरू असल्याने यामागे नक्की गौडबंगाल काय आहे, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

या अपघाताला जबाबदार असलेल्या मद्यपी चालकाच्या रक्ताचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातही चालढकल झाल्याचे बोलले जाते. त्याचा अहवाल येण्यास दोन आठवड्याचा कालावधी लागला. या दरम्यान मद्यपी चालकाला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पुरेसा कालावधी आणि संधी पोलिसांनी दिली.

Nashik Accident News
Video Nawal Bajaj : अतिरिक्त पोलिस महासंचालक नवल बजाज नवे एटीएस प्रमुख

रक्त तपासणीच्या अहवालात संबंधित चालकाने मद्य सेवन केल्याचे आढळले आहे. न्यायाधीश यू.जे.मोरे यांच्या पुढे त्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश मोरे यांनी मद्यपी चालक सुरेश खरमाडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

आता पोलीस खरमाडे याला केव्हा अटक करतात याकडे लक्ष लागले आहे. कोर्टाने अटकपूर्वक जामीन फेटाळल्याने पोलिस या मद्यपी चालकाला आता तरी अटक करण्याची हिंमत दाखविणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com