Attack On Shiv Sena Leader : शिवसेना नेते बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला; गाडीत नसल्याने कोकणे बचावले

Nashik Politics : शिवसेनेत फूट पडल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर असाच हल्ला झाला होता. त्यामुळे त्या घटनेची या प्रकाराचा काही संबंध तर नाही ना, हे तपासहून पाहिले जात आहेत.
Bala Kokne
Bala KokneSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 20 June : नाशिक येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा कोकणे यांचा वाहनावर मध्यरात्री हल्ला झाला. कोकणे गाडीत नसल्यामुळे ते सुरक्षित आहेत. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.

नाशिक शिवसेना (Nashik Shivsena) महानगर उपप्रमुख बाळा कोकणे (Bala kokane) हे पंचवटी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयाजवळ राहतात. मध्यरात्री मोठा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली. त्यांनी कोकणे यांनाही माहिती दिली.

पावसाळ्याचे वातावरण असल्याने बाळा कोकणे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या मारुती स्विफ्ट कारवर (एमएच १५, सिटी ९४६८) मोठा दगड टाकून काच फोडण्यात आली होती. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणे हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर असाच हल्ला झाला होता. त्यामुळे त्या घटनेची या प्रकाराचा काही संबंध तर नाही ना, हे तपासहून पाहिले जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोकणे यांच्यावर गंभीर हल्ला झाला होता. त्या सशस्त्र हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. यासंदर्भात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडे अंगुली निर्देश करण्यात आला होता. सध्याच्या घटनेने त्यांना पुन्हा एकदा इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कोकणे यांनी सांगितले.

Bala Kokne
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना धक्का, आघाडीच्या उमेदवाराला दिली साथ !

या संदर्भात पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सध्या शहराच्या विविध भागात गुंडांकडून वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हा इशारा तर नाही ना? म्हणून राजकीय दृष्टीने या घटनेकडे पाहिले जाते. महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनीही कोकणे यांची विचारपूस करून या घटनेची माहिती घेतली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Bala Kokne
K. P. Patil : कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का, माजी आमदार के.पी. पाटील अजितदादांची साथ सोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com