
Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. 13 आखाड्यांचे महंत या बैठकीला हजर होते. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यावेळी उपस्थित होते. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होणार असून दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.
29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होणार आहे. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर दुसरे अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरे आणि शेवटचे अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील.
बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली.
त्र्यंबकेश्वर अमृतस्नान तारीख
31/10/2026 ला ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला होणार सुरुवात
पहिले अमृतस्नान
2-08-2027
द्वितीय अमृतस्नान
31-08- 2027
तृतीय अमृतस्नान 12-09-2027
नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख
31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान
2-08-2027
द्वितीय अमृतस्नान
31-08- 2027
तृतीय अमृतस्नान
11- 09-2027
मागील कुंभमेळ्यांत शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रित करणे हे मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे यंदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तिसरे अमृतस्नान स्वतंत्र दिवशी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नाशिकला ११ व त्र्यंबकेश्वरला १२ तारखेला तिसरे अमृतस्नान होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.