Nashik Kumbh Mela : कुंभमेळा नियोजनात 'गिरीश महाजनांचा' वन मॅन शो ; 15 आमदार अन् 3 खासदारांना ठेवलंय चार हात लांब!

Girish Mahajan leads a one-man show in Nashik Kumbh Mela 2026 planning, sidelining 15 MLAs and 3 MPs from key meetings and decisions : नाशिकमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कुंभमेळा तयारीला वेग आलेला असून विविध बैठका होत आहे.
girish mahajan
girish mahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये 31ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कुंभमेळा तयारीला वेग आलेला असून विविध बैठका होत आहे. मात्र या बैठका व कुंभमेळ्यासंदर्भातील नियोजनापासून नाशिकच्या महाविकास आघाडीच्या खासदार व आमदारांसह सत्ताधारी आमदारांनाही जाणीपूर्वक दूर ठेवलं जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. कारण विरोधी खासदार सोडाच सत्ताधारी आमदारांनाही या बैठकांचे अधिकृत निमंत्रण नसते.

सध्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात होणाऱ्या विविध बैठकांना स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेणं आवश्यक आहे. मात्र विरोधी पक्षातील तीन्ही खासदार व इतकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनाही या बैठकांसाठी निमंत्रित केलं जात नाही. याबाबत सत्ताधारी पक्षाचे आमदार थेट बोलू शकत नसले तरी विरोधी पक्षातील खासदार भगरे व वाजे यांनी यासंदर्भात अनेकदा खदखद व्यक्त केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी थेट संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. सिंहस्थ कुंभमेळा बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांना विश्वासात घेतलं जात नाही. मतदारसंघात सिंहस्थ कुंभमेळ्याची कोणती कामे होणार आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याची तक्रार भगरेंनी केली होती.

तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही यांसदर्भात आपली खदखद बोलून दाखवली होती. सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. नागपूरात नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सिंहस्थ नियोजनाच्या बैठकीतही महाविकास आघाडीचे खासदार दिसले नाही. शिवाय सत्ताधारी पक्षातील केवळ देवयानी फरांदे या एकमेव आमदार या बैठकीला उपस्थित होत्या. त्यामुळे या सगळ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे का? कुंभमेळ्याचा कारभार वन मॅन शो आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

कुंभमेळा नियोजनसाठी कोट्यावधींचा निधी मिळतो. या निधीत इतर कोणी वाटेकरी नको म्हणूनच हा खटाटोप असल्याच्या चर्चा झडत आहेत. खासदार किंवा आमदार आपल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधीची मागणी करु शकतात. कुंभमेळा संदर्भातील बैठकांचे नियोजन थेट मुख्यमंत्री कार्यालयातून ठरते. त्यामुळे केवळ प्रशासनातील अधिकारी, मुंख्यमंत्री व कुंभमेळा मंत्री यांचाच या सगळ्यांत सहभाग दिसतो. लोकप्रतिनिधींना या बैठकांसाठी निमंत्रणही नसतं. त्यामुळे कुंभमेळ्याभोवताल राजकारण सुरु असल्याची चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com