Ajit Pawar Politics: तपोवनातील झाडांना मिठी मारणाऱ्या चिमुकल्या आणि साधू-संताच्या आवाहनाला अजित दादा धावले, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांची गोची!

Nashik Kumbh Mela Ajit Pawar opposed tree cutting for Sadhu gram BJP Minister Girish Mahajan-साधू ग्राम उभारण्यासाठी तपोवनातील सतराशे झाडे तोडण्याचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा अट्टाहास आहे.
Sayaji Pawar & Ajit Pawar
Sayaji Pawar & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: कुंभमेळ्याच्या साधू ग्राम साठी सतराशे झाडे तोडण्यात येणार आहेत. त्या विरोधात नाशिककरांच्या भूमिकेला वाढता पाठिंबा आहे. आता राज्यभरातून झाडे तोडण्यास विरोध होत आहे.

तपोवन आतील झाडे तोडण्याचा अट्टहास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेला शंकराचार्य आणि स्वामी सोमेश्वरानंद यांपासून विविध साधने विरोध केला आहे. शहरातील हजारो लहान मुलांपासून तर सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आंदोलन केले आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एक्स वर आपली पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी झाडे तोडण्यास नापसंती दर्शविली आहे. या संदर्भात वेगळा पर्याय विचारात घेतला जावा, असे ते म्हणाले.

अजित पवार यांची पोस्ट अशी, तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

Sayaji Pawar & Ajit Pawar
Devendra Fadnavis Politics: शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप वाद, दोघांची युती राहणार का तुटणार?, देवा भाऊंनी स्पष्टच सांगितले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसापूर्वीच वृक्षतोडीचे समर्थन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याचे उदाहरण दिले होते. वृक्षतोड करणे अपरिहार्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स हँडलवर आपली पोस्ट केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांसह मुख्यमंत्र्यांची ही गोची झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वृक्षतोडीच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली.

बारामती मतदारसंघात विविध विकास कामे करताना पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न होतो. अजित पवार यांनी आपल्या मतदारसंघात वृक्षतोडीला स्पष्ट विरोध केला आहे. त्यांची ही भूमिका सातत्याने चर्चेत असते. त्यामुळे आता त्यामुळे आता अजित पवार तपोवन आतील झाडांच्या बाजूने उभे राहतात किंवा कसे याची उत्सुकता लागली आहे.

तपोवन आतील झाडांना वाचविण्यासाठी रोज शेकडो नागरिक आणि विद्यार्थी येथे येऊन आंदोलन करतात. अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि नागरिकांनीही विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वृक्षतोडीला स्पष्ट विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे समर्थक मात्र गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला समर्थन देत आहे. पक्षीय विचार म्हणून ते अपेक्षितच आहे. मात्र रोज वाढता विरोध भाजपला परवडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषता महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपला त्यात वृक्षतोडीच्या असंतोषाच्या प्रतिक्रियांचा मोठा फटका बसू शकतो.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com