Nashik Kumbh Mela : हिंदुत्व अन् कुंभमेळ्याच्या नावाखाली लुटमार; 500 कोटींच्या वर्क ऑर्डरवरून दानवेंचा भाजपच्या महाजनांना घेराव

Ambadas Danve targets Mahayuti over Nashik Kumbh Mela planning and alleged 500 crore work orders : नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर अंबादास दानवेंची महायुती सरकारवर जोरदार टीका; कथित बोगस वर्क ऑर्डरवर कारवाई झाली का, असा सवाल
Ambadas Danve on Kumbh Mela
Ambadas Danve on Kumbh MelaSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela corruption : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि लुटमार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत काही कामांच्या वर्क ऑर्डरवरूनही प्रश्न उपस्थित केले.

नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर खोचक टिप्पणी केली. कोण महाजन आहे? कोण महाजन आहे ना मंत्री? असा सवाल करत त्यांनी महाजन यांच्या जवळच्या नातेवाईकाने 500 कोटी रुपये गोळा करून बोगस वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप केल्याचे सांगितले.

या कथित बोगस वर्क ऑर्डरवर काय कारवाई झाली, असा सवालही शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) दानवेंनी उपस्थित केला. संबंधित प्रकरणात अटक झाली का, कडक कारवाई झाली का, याबाबत पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारला आहे का, असेही त्यांनी म्हटले.

Ambadas Danve on Kumbh Mela
Ambadas Danve : 'फडणवीस भाजपसाठी नागपूरचेही नेते नाहीत, शिंदे खड्डे मोजण्याच्या कामात'; अंबादास दानवेंचा राहुल गांधींच्या Gen-Z संवादावरून हल्लाबोल

पत्रकार देखील झोपलेले आहेत. भ्रष्टाचार झाला आहे की नाही, हे त्यांनी विचारले आहे का? असा सवाल करत दानवेंनी माध्यमांच्या भूमिकेवरही टीका केली. नाशिकमध्ये प्रत्यक्ष जाऊन कुंभमेळ्याच्या नियोजनाची पाहणी करण्याचे आवाहन करत दानवे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या नावाखाली नुसती लुटमार सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली लुटमार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Ambadas Danve on Kumbh Mela
Nashik Pune Railway : ‘वडापाव’वरून थेट ‘माँ के हाथ का खाना’; तांबेंची रेल्वेमंत्र्यांना भावनिक साद

सत्तार राजीनामा देणार? दानवेंनी विषय केला क्लोज

दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार असल्याच्या चर्चेबाबतही दानवेंना प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गळतीला सुरुवात झाली आहे का, असा सवाल करण्यात आला. त्यावर “सत्तार काही राजीनामा देत नसतो,” असे एका वाक्यात उत्तर देत दानवेंनी हा विषय संपवला.

जरांगेवरून सरकारवर निशाणा

मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतल्याबाबतही दानवेंनी सरकारला लक्ष्य केले. भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून केवळ आश्वासने दिली जातात आणि त्यानंतर त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा दावा दानवेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com