Nashik Land Scame: नाशिकमध्ये मूळ मालकाच्या नावावरील भूखंड बेकायदा पद्धतीने बनावट व्यक्तीच्या नावाने टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन वकिलांसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या टोळीने नाशिक शहर व आजुबाजूच्या परिसरात अशा प्रकारचे किमान पाच गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळा शिवारातील सुधीर गुजराथी यांच्या मालकीच्या जमिनीतील एक भूखंड व चेतनानगर येथील संतोष हेगडे यांच्या मालकीचा ५०१ चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट या आरोपींच्या रडारवर होता. आरोपींनी या दोन्ही मूळ मालकांच्या आधारकार्डमध्ये फेरफार करुन नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडले.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी भूखंडांची खरेदी-विक्री केली. तपासादरम्यान आरोपींनी आधारकार्ड अपडेट करण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची बनावट प्रत तयार केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या प्रकारातून खरेदीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश असून, त्यांनी बनावट कागदपत्रांची पूर्तता केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत १४ जणांचा सहभाग समोर आला आहे. त्यामध्ये वकील, जमीन खरेदी-विक्री एजंट, बनावट व्यक्ती तसेच या व्यवहारात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा समावेश आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी नाशिकमधून फरार झाले होते. मात्र, पोलीस पथकाने त्यांचा माग काढत त्यांना भिवंडी येथून अटक केली आहे. या टोळीने नाशिक शहर व आजुबाजूच्या परिसरात आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलीसांना आहे. अशा फसवणूकींना बळी पडलेल्या नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक पोलीसांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.