

वरोरा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत एका इसमाकडून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह कार, मोबाईल असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीक (वय वर्षे ३६) याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शिवसेनेच्या वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.
पद्मालय नगर येथील एका इसमाने आपल्या वाहनात अवैधरित्या एमडी ड्रग्ज बाळगल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार वरोरा पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला आणि गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीकी याला ताब्यात घेतले.
त्याच्या कडील एमएच-३४ सीएच-५७५७ क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता चार झिपलॉक पिशव्यांमध्ये ठेवलेले पांढऱ्या भुरकट रंगाचे ५.७८० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून स्कॉर्पिओ कार (किंमत १० लाख रुपये) आणि मोबाईल फोन (किंमत १० हजार रुपये) जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २१ (ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.