Seema Hire : नाशिक पश्चिम मतदारसंघात लीड मिळूनही सीमा हिरे टेन्शनमध्ये

Lok Sabha result Seema Hire : भाजपच्या आमदार हिरे यांना या मताधिक्याचा आनंद घेण्याआधीच पक्षांतर्गत विरोधाचा गजर सुरू झाला आहे.
Seema Hire
Seema Hiresarkarnama

seema Hire News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला नाशिक पश्चिम मतदार संघातून आघाडी मिळाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपली ही विधानसभेची जागा राखली. नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विजयी झाले. मात्र महायुतीचे हेमंत गोडसे यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून 31 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे विद्यमान आमदार आहेत. मात्र लीड देवूनही हिरे यांचे टेन्शन वाढले आहे.

भाजपच्या आमदार हिरे Seema Hire यांना या मताधिक्याचा आनंद घेण्याआधीच पक्षांतर्गत विरोधाचा गजर सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे दिनकर पाटील यांनी आता थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघातून आपण प्रचाराला सुरुवात देखील केली, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार हिरे यांना हा धक्का मानला जातो.

नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपच्या हिरे या दोन टर्म आमदार आहेत. यंदा त्या हॅटट्रिकची तयारी करीत आहेत. विद्यमान आमदार म्हणून पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सध्या या मतदारसंघात भाजपकडे उमेदवारीसाठी अन्य स्पर्धक कमी आहेत. त्यामुळे हिरे आनंदात होत्या. मात्र आता त्यांचा आनंद फार काळ टिकेल असे दिसत नाही.

Seema Hire
Marathwada Political News : मोदी सरकार 3.0 मधून मराठवाडा आऊट.. भुमरेंना संधी नाही, कराडांना वगळले !

आमदार हिरे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खूप आधीपासून तयारी केली होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला. त्यामुळे पाटील यांची संधी हुकली. लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अधिक जोरकसपणे प्रयत्न करतील अशी चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या खासदार गोडसे यांना भाजपचे आमदार असलेल्या मध्य नाशिक वगळता दोन्ही ठिकाणी आघाडी होती. त्यामुळे महायुतीचा पराभव झाला तरी भाजपचे आमदार मात्र निर्धास्त होते. आता त्यांना उमेदवारीसाठी पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागेल. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून फटाके फुटण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com