Sharad Pawar ON PM Modi: पंतप्रधानांना आमच्या पक्षांची चिंता का? पवारांनी घेतला मोदींचा समाचार

Nashik Lok Sabha Constituency 2024:मोदी यांच्या सभा आणि त्यातील वक्तव्य यांच्या विचार केल्यास त्यांच्याकडे आता बोलण्यासाठी मुद्दे नाहीत असे जाणवते. त्यामुळेच ते धार्मिक विषय आणत आहेत.
Narendra Modi, Sharad Pawar
Narendra Modi, Sharad PawarSarkarnama

Nashik : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) दोघेही काल नाशिक (Nashik Lok Sabha Constituency 2024) दौऱ्यावर होते. या दोघांच्याही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा झाल्या.

मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत काल पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उल्लेख 'नकली'असा करीत मोदींनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला पवारांनी सडेतोड उत्तर दिले.

पवार म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्या सभा आणि त्यातील वक्तव्य यांच्या विचार केल्यास त्यांच्याकडे आता बोलण्यासाठी मुद्दे नाहीत असे जाणवते. त्यामुळेच ते धार्मिक विषय आणत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नकली असे संबोधत आहेत. मात्र त्यांनी काहीही म्हटले तरी जनता त्याला योग्य उत्तर देईल. महाराष्ट्रातील जनतेला खरा शिवसैनिक आणि शिवसेना कोण? हे माहित आहे. उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी आहे, यात कोणालाही शंका नाही,"

Narendra Modi, Sharad Pawar
Bhiwadi Lok Sabha 2024: बाळ्या मामा ही कपिल पाटलांची बी टीम; शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली!

"राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. याबाबत पवार म्हणाले की, लहान लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील असे विधान मी केलेले नव्हते. काँग्रेसच्या विचारधारेशी साम्य असलेले लहान लहान पक्ष आता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देतील, असे विधान मी केले होते. मात्र पंतप्रधान मोदी माझ्या वक्तव्याचा अर्थ सोयीनुसार घेत आहेत," असे खडेबोल पवारांनी मोदींना सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा मूड आता स्पष्ट होऊ लागला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाला फारसा प्रतिसाद मिळेल असे दिसत नाही. याची जाणीव झाल्याने मोदी यांना आता अन्य पक्षांची काळजी वाटू लागली असावी. त्यामुळेच ते आपल्या भाषणात अशी विधाने करत असावेत. मात्र त्याने काहीही फरक पडणार नाही, असा दावाही पवारांनी केला.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com