Nashik Politics : अजित पवार गटाच्या झणझणीत मिसळ पार्टीने शिंदे गटाच्या खासदाराला ठसका!

Nashik Lok Sabha Constituency Politics Ncp Ajit Pawar Group : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट उद्या फुंकणार रणशिंग...
Nashik Lok Sabha Constituency  : Nashik Political News : Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : Nashik Political News : Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Group Misal Party News :

महायुतीचे लोकसभा निवडणुकी संदर्भात जागा वाटपाचे तळ्यात मळ्यात आहे. इच्छुकांनी मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिक मतदार संघ कोणता पक्ष लढवणार हे अनिश्चित असताना Ajit Pawar गटाच्या निवृत्ती आरिंगळे यांनी उद्या मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे.

Nashik Lok Sabha Constituency  : Nashik Political News : Hemant Godse
Rajya Sabha Election 2024: मोठी बातमी ! छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार ? स्वत:च दिली 'ही' माहिती

महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष उमेदवार देणार? याबाबत सावळा गोंधळ आहे. एकाचवेळी अनेक पक्षाचे नेते या मतदारसंघावर दावा करीत आहेत. दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जोरदार जनसंपर्क आणि गाठीभेटी याद्वारे निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

अशातच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते निवृत्ती आरिंगळे यांनी उद्या नाशिक रोड भागात आपले समर्थक आणि पाठीराख्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने ते आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मिसळ पार्टीने लोकसभा निवडणुकीला आणि त्यातील राजकारणाला खमंग फोडणी मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच या मिसळ पार्टीवर सर्वच राजकीय स्पर्धकांचे लक्ष आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आहे. महायुतीच्या संकेतानुसार त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना महायुतीचे अन्य घटक पक्ष देखील जोरात तयारीला लागले असल्याने जागेचे तळ्यात-मळ्यात असले तरी इच्छुकांनी मात्र जोरात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे परस्परांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे. ते भाजपचे आहेत. दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मतदारसंघात भूमिपूजन उद्घाटन आणि जोरदार संपर्क दौरे सुरू केलेले आहे. अशातच आता अजित पवार गटानेही मेळावा जाहीर केला आहे.

नाशिकच्या राजकारणात सामान्यतः इच्छुक उमेदवार मिसळ पार्टीने आपल्या उमेदवारीचे संकेत देत असतात. आरिंगळे यांच्या मिसळ पार्टीतून देखील उमेदवारीचे संकेत आहेत. अशा स्थितीत महायुतीतील इच्छुकांसह विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गात रोज नवे इच्छुक अपशकुन करू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासदार गोडसे अस्वस्थ आहेत.

edited by sachin fulpagare

Nashik Lok Sabha Constituency  : Nashik Political News : Hemant Godse
Chhagan Bhujbal News : धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळांनी जाहीर केली भूमिका, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com