Nashik Lok Sabha 2024 Results LIVE: हेमंत गोडसे आघाडीवर, पण वाजेची भिस्त सिन्नरकरांवरच

Nashik Election Result 2024 Live Updates : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार कोकाटे यांना ९१ हजार, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना ५४ हजार तर युतीचे खासदार गोडसे यांना ३९ हजार मते होती.
Nashik Lok Sabha 2024 Results LIVE
Nashik Lok Sabha 2024 Results LIVESarkarnama

Nashik Lok Sabha 2024 Result News: सिन्नर विधानसभा मतदारसंघात पक्ष दुय्यम आणि गट महत्त्वाचा असतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हेच उमेदवार असल्याने विरोधी गट देखील सायलेंट मोडवर होता.

एक्झिट पोलनुसार हेमंत गोडसे (Hemant Godse) विजयी होणार असे स्पष्ट झाले आहे. गोडसे आघाडीवर असल्याचे पोलच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते, पण वाजेंची भिस्त ही सिन्नर मतदानसंघावर आहे.

गत निवडणुकीत येथील आमदार माणिकराव कोकाटे अपक्ष उमेदवार होते. अपक्ष असूनही त्यांना येथे सर्वाधिक ९१ हजार मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षाला सबंध महाराष्ट्रात सहानुभूती आहे. ही स्थिती विचारात घेतल्यास सिन्नरमध्ये वाजे हा एकमेव पक्ष होता. विरोधी गट मतदान केंद्रावर नव्हता.

या मतदारसंघातील स्थिती पाहता महाविकास आघाडीचे वाजे लाखाचा टप्पा सहज पार करतील. महायुतीचे खासदार हेमंत गोडसे यांनाही विकास कामांच्या जोरावर मतदानाची अपेक्षा आहे.

राज्यातील, जिल्ह्यातील, मतदारसंघातील राजकीय स्थिती, वाजे यांची प्रतिमा आणि त्यांच्यासाठी झटणारे निष्ठावान प्रचार यंत्रणा होती. त्यामुळे निकालाबाबत वाजे निश्चिंत दिसतात खासदार गोडसे यांनाही अपेक्षा आहेत, हे चित्र बोलके आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार कोकाटे यांना ९१ हजार, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना ५४ हजार तर युतीचे खासदार गोडसे यांना ३९ हजार मते होती. यावेळी कोकाटे यांना सिन्नर वगळता काहीही प्रतिसाद नव्हता. यंदा वाजे यांना सिन्नरसह अन्य सर्व विधानसभा मतदारसंघातही प्रतिसाद मिळालेला आहे.

खासदार गोडसे, अध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि महाविकास आघाडीचे वाजे हे प्रमुख उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मतदारांनी मतदानातून नापसंती व्यक्त केली, असे जाणवते.

Nashik Lok Sabha 2024 Results LIVE
Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडीचा गड कोण राखणार, पाटील, म्हात्रे की सांबरे? ; कार्यकर्त्यांकडून मात्र विजयाचे थेट दावे!

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली गद्दारी मतदारांना पसंत नव्हती. त्याबाबत उघड कोणी बोलले नाही. मात्र प्रत्येकाच्या मनात दिसल दिसून आली. आता असे असेल तर निकाल काय लागेल, हे वेगळे सांगणे नको.

त्यामुळे वाजे यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. अन्य उमेदवार देवदर्शनाला गेले अशी स्थिती आहे. एक्झिट पोलमध्ये गोडसेंना कौल मिळाल्यामुळे गुलाल कोण उधळणार हे काही तासातच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com