Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडीचा गड कोण राखणार, पाटील, म्हात्रे की सांबरे? ; कार्यकर्त्यांकडून मात्र विजयाचे थेट दावे!

Kapil Patil, Suresh Mhatre, Nilesh Sambre : भिवंडीचा गड कोण सर करणार याचे अंदाज जरी बांधले जात असले तरी, गुलाल आम्हीच उडवणार असा विश्वास सर्वानीच व्यक्त केला आहे.
Kapil Patil, Suresh Mhatre, Nilesh Sambre
Kapil Patil, Suresh Mhatre, Nilesh SambreSarkarnama

लोकसभा निवडणूक निकालास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अवघ्या देशाला निकालाची प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान 1 जून रोजी निवडणडणुकीच्या अंतिम म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोलचेही निकाल समोर आले. तेव्हापासून प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची धडधड अधिकच वाढल्याचे दिसत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातही अशीच काहिशी परिस्थिती आहे.

एक्झिट पोलच्या निकालानंतर प्रत्येकाच मतदारसंघात सर्वच उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. एक्झिट पोलनुसार भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील(Kapil Patil) हे विजयी होतील, असं दिसून आलं आहे.

Kapil Patil, Suresh Mhatre, Nilesh Sambre
Bhiwandi Lok Sabha Exit Poll : दिल्लीला निघालेल्या 'बाळ्यामामा'ची धाव भिवंडीतच!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे(Suresh Mhatre) आणि अपक्ष म्हणून निलेश सांबरे यांचे आव्हान होते. त्यात कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे यांच्यातच थेट लढत झाल्याचं बोललं जात आहे. भिवंडीचा गड कोण सर करणार याचे अंदाज जरी बांधले जात असले तरी, गुलाल आम्हीच उडवणार असा विश्वास सर्वानीच व्यक्त केला आहे.

Kapil Patil, Suresh Mhatre, Nilesh Sambre
Kapil Patil News : 'राहुल गांधी येवो अथवा अन्य कोणी, भिवंडी लोकसभेच्या निकालात...' ; कपिल पाटलांचा दावा!

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघासाठी २१ मे रोजी मतदान पार पडले. तीन लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल ७४ उमेदवार रिंगणात होते. त्यात राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानल्या जाणाऱ्या भिवंडी लोकसभेच गडवर कोणाचे वर्चस्व असणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे तिसऱ्यांदा विजयाची गुढी उभारण्यासाठी ताकदीने निवडणुकीत उतरले होते. तर, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांनी शड्डू ठोकत निवडणुकीत उतरले होते. तर, निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत निशीब अजमावत होते. त्यामुळे भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसून येत होते.

अशावेळी दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे प्रचार रंगतदार होत असताना, सांबरे बॅकफूटवर गेले. तर, विविध संस्थांच्या माध्यामतून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या माध्यामतून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. असे असले तरी, दुसरीकडे विजयाचा गुलाल आम्हीच उडविणार असा विश्वास या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भिवंडीचा गड कोण राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com