Nashik Loksabha Constituency: 'गोकुळ पिंगळे म्हणतात, 'नाशिक मतदारसंघ आमचाच...'

Mahavikas Aaghadi Politics : महाविकास आघाडीतही नाशिकच्या जागेसाठी शरद पवार गट आणि शिवसेनेत चुरस...
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar Politics: महाविकास आघाडीमध्ये नाशिकचा मतदार संघ कोणाचा? यावर यापूर्वीच निर्णय झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने उचल खाली आहे. हा मतदारसंघ आपलाच, असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप राज्यस्तरावर जवळपास निश्चित झाले आहे. मात्र आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी असणार की नाही, या अनिश्चिततेमुळे जागा वाटप घोषणा लांबली आहे. या वाटाघाटी लांबल्याने आता स्थानिक पातळीवरही कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे - शाहू महाराजांची गळाभेट; संभाजीराजेंची अनुपस्थिती, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येतो. 1999 पासून या मतदारसंघात शिवसेना भाजप युती असतानाही शिवसेनेचाच उमेदवार असतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील नाशिकची जागा ठाकरे गटाला देण्यात येणार याबाबत वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ठाकरे गटाने शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील परस्परांमध्ये समन्वयातून उमेदवार कोण यावर देखील चर्चा केली आहे. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीतील राजकीय चित्र पुरेसे स्पष्ट आहे.

दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या विविध श्रेष्ठ मंडळांनी पक्षनेते शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला. याबाबत विविध सर्वे केले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी येथून उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केली आहे. सध्या श्री पिंगळे यांनी घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह इतर नेत्यांची संपर्क करून हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटेल, असे सांगितले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीत देखील सर्व काही सुरळीत नाही असा संदेश गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस वगळता अन्य दोन्ही पक्षांनी येथून उमेदवार देण्यासाठी गेली दोन महिने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेने या संदर्भात जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव निश्चित केले होते. आता त्यात सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाला अधिक पसंती मिळत आहे. भाजपकडे ही जागा नसल्यामुळे भाजपकडे (BJP) उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या अन्य नेत्यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी लॉबिंग केले आहे.

माजी महापौर दशरथ पाटील, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा लांबल्याने नाशिक मतदारसंघातील या इच्छुकांच्या संख्येत रोज नवी भर पडते आहे. त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, ‘वसंतदादां’ना अभिवादन अन् चंद्रहार पाटलांची उमेदवारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com