BJP News: "शरद पवार आणि राहुल गांधींच्या नादाला लागून..." राऊतांच्या मोदींवरील टीकेला भाजपचं सडेतोड प्रत्युत्तर

Sanjay Raut On Narendra Modi: भाजपने शिवसेना फोडल्याचा राग ठाकरे गटाच्या मनात किती आहे, हे त्यांनी केलेल्या सततच्या आरोप-प्रत्यारोपांतून दिसून येत आहे.
Ram Kadam, Sanjay Raut
Ram Kadam, Sanjay RautSarkarnama

Ram Kadam On Sanjay Raut : देशासह राज्यात मोदी सरकारच्या विरोधात प्रचार करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. भाजपने शिवसेना फोडल्याचा राग ठाकरे गटाच्या मनात किती आहे, हे त्यांनी केलेल्या सततच्या आरोप-प्रत्यारोपांतून दिसून येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) तर सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना दिसत आहेत. 'अब की बार मोदी तडीपार'चा नाराच ठाकरे गटाने जाहीर सभांमधून दिला आहे, तर बुलडाणा येथील सभेत बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजप (BJP) नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपसह (BJP) मित्रपक्षांच्या अनेक नेत्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊतांचे पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या इतर सर्व नेत्यांचे पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही, जिभेला येईल ते बोलत आहेत. तसं बोलणं स्वाभाविक आहे. सगळे आमदार-खासदार, मंत्री सोडून गेल्यामुळे आता कोणाला उभं केलं तर एकही उमेदवार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे. तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, वेड लागण्याची पाळी आली आहे, हे आम्ही समजू शकतो पण तुम्ही औरंगजेबासोबत आपल्या देशाच्या पंतप्रधानांची तुलना कराल? ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली हे तुम्ही विसरलात का?" असं म्हणत कदम यांनी राऊतांना प्रत्यत्तर दिलं आहे.

तसेच, औरंगजेबाने हिंदूची मंदिरे तोडली आणि मोदींनी हिंदूंची मंदिरे बांधली. अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) असेल किंवा काशी विश्वनाथांच मंदिर असेल एवढेच नव्हे तर मुस्लिम राष्ट्र अबुधाबीतही मोदींनी हिंदू देवतांचे मंदिर बांधले आहे. पण तुम्ही शरद पवार आणि आमच्या सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नादाला लागून बाळासाहेबांचे विचार तर गहाण ठेवले आहेतच. पण निदान शब्दांचा उपयोग करण्यापूर्वी औरंगजेब कोण होता? याची माहिती नसेल तर ते आधी माहिती करून घ्या," असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

Ram Kadam, Sanjay Raut
Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लुडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

बुलडाणा (Buldhana) येथील शिवसेना ठाकरे गटाच्या जाहीर मेळाव्यात बोलताना, राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये ज्या ठिकाणी मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे." एवढ्यावरच राऊत थांबले नाहीत तर ते म्हणाले, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब (Aurangzeb) म्हणा" राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Jagdish Patil)

R

Ram Kadam, Sanjay Raut
Owaisi On Shah : 'मजलीस को उखाड के फेको गे क्या' म्हणणाऱ्या शाहांना ओवेसींचं सडेतोड प्रत्युत्तर; 'भाजपचं अस्तित्व...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com