Lok Sabha Election 2024: नेत्यांचा सल्ला डावलून शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात; थेट प्रचाराला केली सुरुवात

शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गट आणि मनसेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक झाल्यामुळे त्यांच्यावर विसंबून न राहता महाराजांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे.
Lok Sabha Election 2024: नेत्यांचा सल्ला डावलून शांतीगिरी महाराज  निवडणुकीच्या रिंगणात; थेट प्रचाराला केली सुरुवात
Sarkarnama
Published on
Updated on

Nashik loksabha election 2024: जनार्दन स्वामी मठाचे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी नेत्यांचा सल्ला डावलून थेट प्रचाराला सुरुवात केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक क्षेत्रातील शंभर मतदारसंघांमध्ये नाशिक मतदारसंघाचा (Nashik Constituency) समावेश आहे. याचे भाजपने राम सर्किट असे नामकरण केले आहे. या मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष आहे. मात्र आता हा मतदारसंघ शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाला गेला आहे. या मतदारसंघातून महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. कारण शांतीगिरी महाराजांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्याचा औरंगाबादसह अन्य मतदारसंघात भाजपला लाभ होईल असा अंदाज होता. मात्र आता हा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) शिवसेना शिंदे गट आणि मनसेकडे (MNS) उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन्ही पक्ष आता महायुतीचे घटक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून न राहता शांतिगिरी महाराजांनी थेट प्रचाराला सुरुवात करीत आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. शांतीगिरी महाराजांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षातून प्रचारासाठी वाहनांची परवानगी देखील घेतली आहे. निवडणूक प्रचारासाठी अपेक्षित ना हरकत दाखले देखील त्यांनी घेतले आहेत. असे करणारे ते नाशिक (Nashik) मतदारसंघातील पहिले उमेदवार आहेत. त्यांच्या राज्यभरातील अनुयायांसाठी शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी महत्त्वाची आहे. अनेक भागातून त्यांचे भक्त प्रचाराला येतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राजकारणाचे शुद्धीकरण या मोहिमेंतर्गत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरात त्यांचे सुमारे 1.88 लाख भाविक भाविक आहेत. याशिवाय सिन्नर आणि इगतपुरी या दोन मतदारसंघात देखील त्यांचा चांगला संपर्क आहे. त्याचा लाभ या निवडणुकीत होईल, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळेच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी न देण्याचा सल्ला डावलून ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांची उमेदवारी धार्मिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसाठी चर्चेचा विषय आहे.

Lok Sabha Election 2024: नेत्यांचा सल्ला डावलून शांतीगिरी महाराज  निवडणुकीच्या रिंगणात; थेट प्रचाराला केली सुरुवात
Lok Sabha Election 2024 News : 12 तारखेला 12 वाजता..! शिवतारेंचा निर्धार...असा आहे लोकसभेचा प्लॅन

मोदी-शांतीगिरी महाराजांचा 'तो' फोटो व्हायरल

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शांतीगिरी महाराजांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नाशिकमधील रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे शांतीगिरी महाराजांना भेटले होते. त्यावेळचा फोटो व्हायरल केला जात आहे. शिवाय यावेळी लोकसभेच्या तयारीला लागा, असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचा उल्लेख फोटोच्या कॅप्शनमध्ये करण्यात आले आहे.

(Edited By Jagdish Patil)

Lok Sabha Election 2024: नेत्यांचा सल्ला डावलून शांतीगिरी महाराज  निवडणुकीच्या रिंगणात; थेट प्रचाराला केली सुरुवात
Loksabha election 2024 : महायुतीतील जागावाटपाचा घोळ शिंदे गटाच्या फुटीची पायाभरणी ठरेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com