Nashik Loksabha : नाशिकात ठाकरे गटाला धक्का! विजय करंजकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Loksabha Election : विजय करंजकर वाजे यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. करंजकर यांच्या प्रचारात सहभागी न होण्याच्या निर्णयाने ठाकरे यांनी करंजकर यांना गृहीत धरलेले नाही.
Vijay Karanjkar,  uddhav thackeray
Vijay Karanjkar, uddhav thackeray Sarkarnama

Nashik Political News : शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे इच्छुक असलेले विजय करंजकर नाराज झाले. त्यांनी गेले तीन आठवडे जाणीवपूर्वक ठाकरे गटापासून अंतर ठेवले आहे. ते काय भूमिका घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका लागली होती. उद्धव ठाकरे त्यांची समजूत काढतील, अशी शक्यता होती. मात्र, करंजकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती आहे.

Vijay Karanjkar,  uddhav thackeray
Chhagan Bhujbal Nashik Loksabha : छगन भुजबळ यांची नाशिकमधून माघार, सांगितले खरे कारण...

सूत्रांच्या माहितीनुसार, विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. करंजकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 'लढणार पण आणि पाडणार पण' अशी घोषणा केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर पुढील दोन दिवसांत ते भूमिका ठरविणार होते. मात्र, गेले तीन आठवडे त्यांनी मातोश्रीवर जाण्याचे आणि नेत्यांची भेटदेखील टाळली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात वेगळेच मनसुबे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजय करंजकर (Vijay Karanjkar ) यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठांच्या बैठकीत करंजकर यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले होते. यावेळी अन्य पदाधिकारी यांनीच करंजकर यांच्या भेटीत मोडता घातला होता. त्यानंतर स्थानिक नेत्यांनीदेखील शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांची संपर्क केला होता. मात्र मातोश्रीकडून आलेल्या निरोपाकडे करंजकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि करंजकर यांच्यातील दुरावा वाढत गेला.

करंजकर वाजे यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. करंजकर यांच्या यांच्या प्रचार सहभागी न होण्याच्या निर्णयाने ठाकरे यांनी करंजकर यांना गृहीत धरलेले नाही. करंजकर यांचे अनेक सहकारी एक-दोन दिवसांत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे गटाचा (Shinde group) नाशिक मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्यावर प्रचाराचा शुभारंभ होईल. या वेळी करंजकर आपल्या भगूर येथील काही सहकारी आणि नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करतील. त्याबाबतची सर्व तयारी झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच करंजकर यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का देण्याचा इरादा आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतील हे सांगता येत नाही. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार वाजे हे प्रचारात खूपच पुढे आहेत. त्यामुळे शिंदे गटाला उमेदवार जाहीर केल्यावरदेखील त्यांचा पाठलाग करावा लागेल असे चित्र आहे.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com