Shivsena UBT News : शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचे तिकीट कोणी कापले?

Political News : शिवसेना ठाकरे गटाचे करंजकर यांना एक वर्षांपूर्वी लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची उमेदवारी कापण्यात आली.
Vijay Karanjkar,  uddhav thackeray
Vijay Karanjkar, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nashik constituency 2024: शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नाशिक मतदारसंघात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीवर पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा दावा होता. करंजकर यांना उमेदवारी का नाकारली ? याची कारणे आता स्पष्ट होऊ लागली आहेत.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर ( Vijay Karnjkar) यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते सध्या नाराज आहेत. ते अद्याप शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. विजय करंजकर सध्या शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून देखील चर्चेत आहेत, असे असले तरीही गेल्या बारा दिवसांत मातोश्रीने करंजकर यांच्या नाराजीची दखल न घेऊन करंजकर यांना ठाकरे गटाने स्पष्ट संकेत दिले आहेत. (Shivsena UBT News)

Vijay Karanjkar,  uddhav thackeray
Dhananjay Munde News : 'आता 'खान की बाण' विसरा अन् विकासाची 'जान'असणाऱ्याला निवडा' ; धनंजय मुंडेंचं आवाहन!

या संदर्भात सूत्रांनी सांगितले की, करंजकर यांना लोकसभा उमेदवारीचे संकेत देण्यात आले होते. त्याबाबत त्यांना विविध सूचनाही करण्यात आल्या होत्या. विशेषता मतदार संघात संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे काम अपेक्षित होते. मात्र ते होऊ शकले नाही. शिवसेनेच्या नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी अधिवेशन यशस्वी झाले, मात्र त्यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होती, असे सांगून करंजकर यांना स्पष्ट संकेत दिले होते.

शिवसेना राज्यस्तरीय अधिवेशनानंतर युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचा घोटी आणि सिन्नर येथे दौरा होता. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत मिळावे होणार होते. मात्र घोटी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी अपेक्षित कार्यकर्तेच आले नव्हते. त्यामुळे ती सभा रद्द करावी लागली. सिन्नर येथे देखील पुरेसा संवाद नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीतून त्यांनी या मेळाव्याची जबाबदारी असलेले जिल्हाप्रमुख करंजकर यांना संदेश मिळाला होता, असेही बोलले जात आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत इगतपुरीसह दोन ठिकाणी महिलांचे मेळावे होणार होते. शिवसेनेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांचे विशेष महत्त्व होते. मात्र, या मेळाव्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण भागातील संघटन वादात सापडले होते. त्याची वरिष्ठ स्तरावरही चर्चा झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे पक्षाने उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला की काय ? अशी शंका येते.

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेच्या तोंडावरच मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले. यामध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे पद काढून त्यांना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. शहरातील विलास शिंदे यांना महानगरप्रमुख तर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हाप्रमुख अशी पदोन्नती देण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात यावयाच्या वॉर रूमच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईहून चार तज्ञांचे पथक पाठविले होते, अशी चर्चा आहे. या पथकाने प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी वॉर रूमचे काम दिलेल्या तज्ञांनी अनभीज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी वॉर रूम उभी करण्यात आलेली नाही, अशी माहिती दिल्याचे कळते. या सर्व घडामोडीमुळे तर करंजकर यांची उमेदवारी कापण्यात आली नाही का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मातोश्रीवरून भेटीच्या संदेशाची प्रतीक्षा

करंजकर यांना खरोखरच मातोश्रीवरून भेटीचा संदेश येईल का? गेले दहा ते बारा दिवस त्यांना भेटीबाबत काहीही निरोप का देण्यात आलेला नाही? हा सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न आहे. या स्थितीत करंजकर यांना लोकसभा प्रचारात सहभागी होण्याचा अप्रत्यक्ष संदेश तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Vijay Karanjkar,  uddhav thackeray
Nashik Shivsena : मुख्यमंत्री शिंदेंचा गोडसेंना सबुरीचा सल्ला; पण समर्थकांची लढून जिंकण्याची तयारी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com