Nashik Crime : नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद', पोलिसांनीच गुन्हेगाराला सावध करुन फरार केलं ; भाजप शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

Nashik Love Jihad case Sunil Kedar allegations : नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एक अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादची बळी ठरली असून पोलिसांनी संशयित आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप भाजप शहराध्यक्षांनी केला आहे.
Sunil Kedar allegations
Sunil Kedar allegations Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथे एक अल्पवयीन हिंदू मुलगी लव्ह जिहादची बळी पडली असून मागील चार वर्षांपासून एक मुस्लीम युवक तिला मानसिक त्रास देत होता. या मुलीने व पीडित कुटुंबाने माझ्याकडे यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी दिली. केदार यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

केदार यांनी सांगितले की, वणी येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक हिंदू कुटुंब राहत होतं. त्याठिकाणी एक मुस्लीम युवक त्या हिंदू मुलीला चार वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता. तू माझ्या बरोबर लग्न नाही केलं, संबंध नाही ठेवले तर मी तुझ्या आई-वडिलांचा खून करेल अशा धमक्या तिल्या दिल्या जात होत्या अशी माहिती भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी दिली आहे.

एक-दोन वेळा पीडित हिंदू कुटुंबाने पोलिसांकडे मदत मागितली पण पोलिसांनी काही मदत केली नाही. म्हणून पीडित कुटुंब नाशिकमध्ये राहायला आले. या कुटुंबाने वणी येथून नाशिकला स्थलांतर केले तरी सुध्दा या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई-वडील व भावाला त्रास सुरूच राहिला.

Sunil Kedar allegations
Nashik Kumbh Mela : नाशिक महापालिकेचे 3 हजार कोटींचे अंदाजपत्रक ; कुंभमेळ्यासाठी मात्र फक्त 1 कोटी रुपयांची तरतूद

माझ्याबरोबर लग्न कर नाही तर तुझ्या आई वडिलांचा खून करू अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. मुलीने अखेर विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली. त्यानंतर मुलीच्या आई-वडि‍लांनी हे प्रकरण भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांना सांगण्याचे ठरवले. त्यानुसार सुनील केदार यांच्याकडे त्यांनी यासंदर्भात तक्रार केली. सुनील केदार यांनी गांभीर्याने लक्ष घालत या प्रकरणात दखल घेतली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी मला कॉलरेकॉर्डिंग ऐकवली. त्यात तो मुलगा तिला धमकी देतोय की, तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तूझा खून करील. सदर मुलगी हुशार असूनही केवळ भितीपोटी मुलीच्या आई वडिलांनी तिला १२ वी च्या परीक्षेला बसू दिले नाही व घरातच ठेवले. या मुस्लिम कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा असून केवळ भितीपोटी स्थानिक कोणी पुढे येत नाही असं सुनिल केदार यांनी सांगितलं.

Sunil Kedar allegations
Devendra Fadnavis : युद्धामुळे महाराष्ट्रातील नागरिक अकडले, मुख्यमंत्र्यांनी संकटमोचक महाजनांवर सोपवली मोठी जबाबदारी..

या प्रकरणात वणी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी सहभागी असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध केले व त्याला परराज्यात फरार केल्याचा आरोप भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती संशयित युवकाच्या मोबाईलवर कोणी पाठवली, त्याला ही माहिती तसेच त्याच्या वडिलांना कशी मिळाली याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सदर पोलिसाला त्वरीत निलंबित करावे व त्याचीही सखोल चौकशी करावी असे केदार यांनी म्हटले आहे. वणी परिसरात पोलिसांच्या मुक संमतीने अवैध धंद्यांना ऊत आला असून जे जे पोलिस यात सहभागी आहेत त्यांचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी केदार यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com