Maratha Reservation Impact : छगन भुजबळ आंदोलकांच्या निशाण्यावर; आधी लासलगाव, आता येवला समितीतूनही बाहेरचा रस्ता

Nashik Bazar Samiti : मराठ्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याला भुजबळांच्या विरोधानंतर येवल्यात सकल मराठा समाज आक्रमक
Nashij Maratha Reservation :
Nashij Maratha Reservation :Sarkarnama

Maratha reservation news : राज्यातील नेतेमंडळी मराठा समाजाच्या निशाण्यावर आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता छगन भुजबळ हेदेखील मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहेत.

येवल्यात बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमधून त्यांच्या प्रतिमा काढल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना काहीशी ताजी असतानाच आता आरक्षणासाठी येवल्यातही मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून, भुजबळ यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashij Maratha Reservation :
Shiv Sena MLA Disqualification : अध्यक्ष नार्वेकरांची होणार तारेवरची कसरत? अधिवेशन कामकाजासह 'अपात्रता' प्रकरणी...

प्रतिमाच काढून टाकली

मराठा आरक्षणावर राज्य शासन ठोस भूमिका घेत नसल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा संतापाचा उद्रेक होत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या येवल्यात मराठा आंदोलकांनी त्यांच्या प्रतिमाच काढून टाकल्याची घटना समोर आली. कार्यकर्त्यांनी येवला बाजार समितीत जोरदार घोषणाबाजी करीत भुजबळांच्या भव्य प्रतिमा काढून टाकल्या. तोडफोड करून त्यावर शाई फेकली. पंचायत समिती, अंदरसूल ग्रामपंचायत, कोटमगाव रोड आदी ठिकाणच्या विविध कार्यालयातील भुजबळांच्या प्रतिमा हटवून निषेध नोंदविला.

मंत्रिमंडळातील बैठकीत मराठ्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याला भुजबळांच्या विरोधानंतर येवल्यात सकल मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत असून, बीड येथील घटनेमुळे आज सकाळपासूनच भुजबळ यांच्या येथील संपर्क कार्यालयाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, दुपारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयात लावण्यात आलेल्या भुजबळ यांच्या प्रतिमांना लक्ष करून निषेध व्यक्त केला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात प्रवेश करत सभापतीच्या दालनात व कार्यालयात लावण्यात आलेल्या भुजबळांच्या प्रतिमा काढून बाजार समिती आवारात आणल्या. या ठिकाणी या दोन्ही प्रतिमांची तोडफोड करत प्रतिमांवर शाई फेकून संताप व्यक्त केला. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. या वेळी कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Nashij Maratha Reservation :
Shiv Sena MLA Disqualification : अध्यक्ष नार्वेकरांची होणार तारेवरची कसरत? अधिवेशन कामकाजासह 'अपात्रता' प्रकरणी...

यानंतर कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात गाठले. या ठिकाणी सभापती दालनात लावलेल्या भुजबळांच्या प्रतिमेसह महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा एकत्रित असल्यामुळे सदरची प्रतिमा सन्मानपूर्वक काढून कार्यालयात जमा करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले यांची नवी प्रतिमा आणून सभापती दालनात सन्मानपूर्वक प्रतिमा बसवण्यात आली आहे. या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळ यांच्या विरोधातदेखील जोरदार घोषणाबाजी केली.

तालुक्यातील अंदरसूल येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेली भुजबळ यांची प्रतिमा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली. तसेच कोटमगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या भुजबळ यांच्या प्रतिमादेखील काढण्यात आल्या आहेत.

सुरेगावला उपोषण सुरू

मराठा आरक्षणासाठी सुरेगाव रस्ता येथे बेमुदत उपोषण सुरू असून, उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणादरम्यान उपोषणकर्ते वाल्मीक मगर यांची प्रकृती खालावलेली असल्याने डॉक्टरांनी त्यांना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी ग्रामस्थांसह तरुणही रोज साखळी उपोषणात सहभागी होत आहेत. शिवाय रोज रात्री आंदोलनाच्या ठिकाणी कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम होत आहे. रविवारी रात्री ग्रामस्थांसह महिलांनी एकत्रित येत कँडल मार्च काढून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, अशा प्रकारची आंदोलने रोज सुरू ठेवण्यात येतील, अशी माहिती आंदोलनकर्ते विजय पठाडे यांनी दिली.

Nashij Maratha Reservation :
Maratha Reservation : आरक्षणाचा माझा फॉर्म्युला सरकारला नको आहे का? राठोडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com