Former Mayor Abdul Malik Yunus Isa
Former Mayor Abdul Malik Yunus Isa Sarkarnama

Malegaon News : धक्कादायक! मालेगावच्या माजी महापौरांवर तीन गोळ्या झाडल्या; एक पायाला, दुसरी छातीजवळ अन्...

Malegaon Former Mayor Firing News : माजी महापौरांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पण, अद्याप हल्लेखोरांचा कोणताही सुगावा लागला नाही.

Malegaon Firing News, 27 May : मध्यरात्री माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.

यामध्ये गोळीबाराच्या घटना वाढत असल्यानं शहरात अस्वस्थता आहे. याबाबत अनेक नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटना चर्चेचा विषय असताना रविवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला.

मालेगाव शहराचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा (Abdul Malik yunus Isa ) रात्री शहरातील मध्यवर्ती चौकात मित्रांसमवेत चहा पीत होते. यावेळी मोटर सायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेमुळे खळबळ उडाली. यावेळी धावपळ उडाल्याने हल्लेखोर फरार झाले. यावेळी तातडीने ईसा यांना द्वारका मनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ईसा यांच्या पायाला डाव्या पायाला एक गोळी, दुसरी गोळी दंडाला चाटून गेली आणि तिसरी गोळी छातीजवळ लागली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

छातीतील गोळी अद्याप निघालेली नाही, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. याप्रकरणावर पोलिस लक्ष ठेवून आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणचाही मागमूस लागलेला नाही. हल्लेखोर शहरातच लपून बसल्याची शक्यता आहे.

Former Mayor Abdul Malik Yunus Isa
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

या घटनेची माहिती मिळतात 'एमआयएम'पक्षाचे कार्यकर्ते आणि ईसा यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून संतप्त जमावाला शांत केले.

मालेगाव शहर विणकारांचे शहर आहे. त्यामुळे दिवसभर नागरिक काम करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथील तापमान अन्य शहरांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे बहुतांशी नागरिक मध्यरात्रीपर्यंत चौक आणि बाजार पेठेत गप्पा मारत थांबलेले असतात. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Former Mayor Abdul Malik Yunus Isa
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com