Nashik MLC: एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराची नाशिकमध्ये दिवसभर धावपळ, पण हाकेच्या अंतरावरील 'संकटमोचक' त्यांच्यासाठी 'नॉट रिचेबल'

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्याची दिवसभर धावपळ सुरू असताना महत्त्वाचे संकटमोचक संपर्काबाहेर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News: विधान परिषदेची निवडणूक महायुतीसाठी परस्परांना भविष्यातील रणनीती स्पष्ट करणारी ठरू शकते. त्याची प्रचिती जळगाव आणि नाशिक येथून येऊ लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाला स्पष्ट संदेश मिळाल्याची चर्चा आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गोकुळ पिंगळे या अपक्ष उमेदवाराने बंड केले आहे.

त्यांच्या जोडीला नाशिकच्या राजकारणात स्थान नसलेले प्रसाद हिरे आले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला चांगलेच दमवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने महाविकास आघाडीला टिवचट आले आहेत. ठाण्याची निवडणूक बिनविरोध केल्यावरही त्यांनी महाविकास आघाडीला कमी लेखण्याची संधी सोडली नाही. हे सुरू असताना त्यांच्या पायाखाली काय राजकारण शिजते आहे, हा चर्चेचा विषय आहे.

Uday Samant
K Annamalai new political party : अन्नामलाईंच्या नव्या पक्षाला अवघ्या 10 तासांत 10 लाखांचा पाठिंबा; तामिळनाडूत नेमकं काय घडतंय?

मंत्री उदय सामंत बंडखोरांना शांत करण्यासाठी नाशिकला दुसऱ्यांदा आले. दिवसभर त्यांनी राजकीय मुत्सद्येगिरी दाखविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी कोकणात आणि ठाण्यात किती सहज निवडणुका काबीज केल्या, हे उदाहरण ताजे आहे. मंत्री सामंत यांच्या पहिल्या दौऱ्यात त्यांच्या जोडीला शिंदेंचे दुसरे मंत्री दादा भुसे हे देखील होते. या दौऱ्यात गोरख बोडके आणि राष्ट्रवादी अजित पक्षाच्या मुळातच स्पर्धेत नसलेल्या उमेदवारांनी त्यांचा बराचसा वेळ खाल्ला. प्रमुख बंडखोर गोकुळ गीते या दौऱ्यात त्यांना भेटलेच नाही.

शुक्रवारी मंत्री सामंत दुसऱ्यांदा नाशिकला आले. यावेळी मात्र हद्द झाली असे म्हणावे लागेल. यावेळी भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन हे देखील शहरातच होते. दिवसभर उदय सामंत शिष्टाचार आणि ताफा सोडून उमेदवार गोकुळ गीते आणि मंत्री महाजन यांच्या भेटीसाठी शहरभर फिरले. मात्र यातील कोणीही त्यांना हाती लागले नाही.

शिवसेनेचे मंत्री सामंत यांचा शुक्रवारी झालेला दौरा राजकीय दृष्ट्या स्पष्ट संदेश देणारा म्हणता येईल. हाकेच्या अंतरावर असलेले भाजपचे संकट मोचक मंत्री महाजन त्यांना दिवसभर भेटू शकले नाही. त्याचा खुलासा मंत्री महाजन यांनीच रात्री उशिरा केला. कार्य बाहुल्यामुळे आपली भेट झाली नाही, असे महाजन म्हणाले.

.

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये गोकुळ पिंगळे यांनी आपण अपक्ष आहोत. आपल्यावर मंत्री सामंत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मंत्री सामंत यांना आपण कोणताही दबाव आणला नाही असे सांगण्याची वेळ आली.

Uday Samant
Nashik MLC Election : महाजन-सामंत यांच्यात का रे दुरावा? गोकुळ गितेंची समजूत काढायला आले पण दोघे एकमेकांना भेटले सुद्धा नाही

नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत घडलेल्या या घडामोडी पुरेशा बोलके आहेत. या माध्यमातून भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला आगामी राजकारणाची जाणीव तर करून देत नाही ना, अशी चर्चा आहे. त्या दृष्टीने विधानपरिषद निवडणूक सुरुवातीलाच एवढी रंगतदार झाली तर पुढे काय होईल? या चर्चेने सगळ्याच मतदार नगरसेवकांमध्ये आनंदी आनंद आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com