Nashik Mayor : ठरलं ! नाशिक महापौर पदाची माळ महिलेच्या गळ्यात पडणार, ही १० नावे रेसमध्ये

Nashik mayor reservation : कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौर पदावर आता महिला बसणार हे फिक्स झाले आहे. नाशिक महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
NMC building |Nashik NMC election News
NMC building |Nashik NMC election NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास खात्याकडून आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीनुसार नाशिक महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महिला महापौर होणार आहे.

नाशिक महापालिका महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. दरम्यान,नाशिक महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असून स्वबळावर 72 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदावर भाजपचीच वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. महापौरपदासाठी भाजपमधील अनेक दिग्गज महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.

सर्वसाधारण महिला प्रवर्गात भाजपच्या या नगरसेविकांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत...

-दीपाली गणेश गिते

- चंद्रकला धुमाळ

- हिमगौरी आडके

- रोहिणी पिंगळे

- स्वाती भामरे

- माधुरी बोलकर

- संध्या अभिजीत कुलकर्णी

- प्रतिभा बाळासाहेब पवार

- डॉ. योगिता अपूर्व हिरे

- डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी

दरम्यान नाशिकच्या महापौर पदावर कोण बसवायचं हे नाशिक मध्ये भाजपची सत्ता आणण्याचे श्रेय जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याच हातात असेल असे बोलले जात आहे. आगामी कुंभमेळा पाहाता पक्षाचा चेहरा व नेतृत्व अत्यंत महत्वाचे राहणार आहेत. त्यात भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी निष्ठावंताना संधी दिली जाईल असे म्हटले होते. त्यामुळे या निकषांवर महापौर चेहरा ठरवला जाऊ शकतो.

पहिला विचार दीपाली गितेंचा

नाशिकच्या महापौर पदासाठी दीपाली गणेश गिते यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. दीपाली गिते यांच्या कुटुंबात सहकारचा अनुभव आहे. राजकीय पाठबळ, उच्च शिक्षण व दांडगा जनसंपर्क आहे. महत्वाचे म्हणजे त्या प्रतिनिधित्व करत असलेल्या पंचवटी भागात कुंभमेळा होणार असल्याने त्यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये आहे. त्यामुळे कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन हे देखील महापौर पदासाठी पहिला विचार दीपाली गणेश गिते यांचा करु शकतात.

दरम्यान त्यानंतर प्रमुख दावेदारांमध्ये हिमगौरी आहेर-आडके, चंद्रकला धुमाळ यांचेही नाव घेतले जात आहे. त्यापैकी हिमगौरी आहेर-आडके या चांदवडचे भाजप आमदार राहुल आहेर यांच्या चुलत बहिण आहेत. मात्र राहुल आहेर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान तसा शब्द दिला होता. राहुल आहेर मंत्री होणार असल्यास एकाच घरात मंत्रीपद व महापौर होत असल्याने हिमगौरी आहेर-आडके यांच्यापुढे ती अडचण येऊ शकते.

चंद्रकला धुमाळ यांचाही होऊ शकतो विचार

दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी निष्ठावंतांना पदे दिली जातील असे म्हटले होते. वरील उमेदवारांमध्ये निष्ठावंताचा विचार केल्यास चंद्रकला धुमाळ यांचे चान्सेस जास्त आहेत. त्यांचे पती दिगंबर धुमाळ अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निष्ठावान या कॅटेगिरीत चंद्रकला धुमाळ परफेक्ट बसतात.

दीपाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी यांचीही नावे चर्चेत आहेत. पण ब्राम्हण समाजाला यापूर्वी संधी दिली गेली आहे. संध्या कुलकर्णी यांचे वडील सतीश कुलकर्णी हे महापौर होते. त्यामुळे पुन्हा त्यांच्याच घरात हे पद जाण्याची शक्यता कमी आहे. रोहिणी पिंगळे हे आत्ताच निवडून आलेलं नवखं नेतृत्व आहे. अलिकडेच त्यांचे पती भाजपचे पदाधिकारी झाल्याने त्यांच्या नावाची साशंकता कमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com