Nashik NMC : नाशिक महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांसाठी ३० एप्रिलला निवडणूक, कुणाचा राहणार वरचष्मा, कसे आहे संख्येचे गणित?

Nashik municipal ward committee elections : मनुष्यबळाचा अभाव असल्याने ६ प्रभाग समित्याच कार्यरत राहणार आहे. ३० एप्रिलला निवडणूक होणार असून प्रभाग समिती सभापतींची निवड केली जाणार आहे.
NMC Building, Nashik.
NMC Building, Nashik.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik municipal election : प्रभाग समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (ता. ३०) निवडणुका होणार आहे. त्यासाठी अप्पर विभागीय आयुक्त अजय मोरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, एकाच दिवशी सहा प्रभाग समिती सभापतींची निवड केली जाणार आहे.

महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. विरोधी पक्षनेते, सभागृहनेतेपदाची घोषणा अद्याप झाली नाही. त्यामुळे नगरसचिव विभागाने प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. मनुष्यबळाचा अभाव असल्याने सहा प्रभाग समित्याच कार्यरत राहणार आहे. दरम्यान, प्रभाग समितीवरही भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. भाजपचे ७२ नगरसेवक व सत्तेत सहभागी शिवसेनेचे २६ नगरसेवक असल्याने युतीकडचे बहुतांश प्रभाग राहतील.

समित्यांवर महायुतीचा वरचष्मा

पंचवटी विभागात २४ पैकी भाजपचे २१ नगरसेवक असल्याने स्पष्ट बहुमतावर भाजपकडे सत्ता राहील. सातपूर विभागात २० पैकी १४ भाजपचे नगरसेवक असल्याने येथेही भाजपकडेच सत्ता असेल. पश्‍चिम विभागात १२ पैकी सात भाजपचे नगरसेवक असल्याने येथेही भाजपचीच सत्ता असेल. पूर्व विभागात १९ पैकी भाजपचे नऊ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे चार नगरसेवक असल्याने युती म्हणून प्रभाग समितीवर सत्ता येईल. सिडकोत २४ पैकी भाजपचे १२ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे सात नगरसेवक असल्याने येथेही युती म्हणून प्रभाग समितीवर सत्ता येईल. नाशिक रोड विभागात २४ पैकी शिवसेनेचे (उबाठा) १० नगरसेवक आहे. भाजपचे नऊ तर शिवसेनेचे चार असे १३ नगरसेवक युतीकडे असल्याने येथेही युती म्हणून सत्ता येईल.

NMC Building, Nashik.
Nashik NMC : मुख्यमंत्री फडणवीसांनी वाजवली 'रिंगिंग बेल', नाशिक महापालिकेची कामे लागणार झटपट मार्गी

असा आहे निवडणूक कार्यक्रम

विभाग वेळ

पूर्व सकाळी १० ते ११

पश्चिम सकाळी ११.३० ते १२.३०

पंचवटी दुपारी १ ते २

सिडको दुपारी २.३० ते ३.३०

सातपूर दुपारी ४ ते ५

नाशिक रोड सायंकाळी ५.३० ते ६.३०

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com