Girish Mahajan Politics: गिरीश महाजन उतरले मैदानात; तिन्ही आमदारांना लावले कामाला!

Nashik Corporation Election Girish Mahajan Campaign: गिरीश महाजन यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांची दूरध्वनीवरून संपर्क केला आहे. प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला. उमेदवारांच्या प्रचारात आणि अन्य अडचणीत नेमके काय करावे याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
Girish Mahajan,Nashik NMC Election
Girish Mahajan,Nashik NMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

BJP Nashik News: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. भाजपच्या हंड्रेड प्लस उद्दिष्टासाठी मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. भाजपने आक्रमक प्रचार करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसेची संयुक्त सभा काल शुक्रवारी झाली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात नाशिक शहरात सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार आक्रमक प्रचार करणार असल्याची चिन्हे आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गेले दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र त्यांनी कोणाशीही गाठीभेटी घेतलेल्या नाहीत. प्रकृती बरी नसल्याने ते मुक्कामाच्या ठिकाणावरूनच सूत्रे हलवत आहेत. गेल्या दोन दिवसात प्रकृती बरी नसतानाही गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही आमदारांना विविध सूचना केल्या. तिन्ही आमदारांनी मतदार संघातील प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी व्हावे. इतरांना जाणवणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.

स्वतः मंत्री महाजन यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांची दूरध्वनीवरून संपर्क केला आहे. प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला. उमेदवारांच्या प्रचारात आणि अन्य अडचणीत नेमके काय करावे याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

Girish Mahajan,Nashik NMC Election
Eknath Shinde News: मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला डाव! लातुरातील 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

महापालिकेच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल. रविवारी होणाऱ्या या सभेने निर्णय वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सभेत प्रामुख्याने भाजपला टार्गेट केले. पक्षांतर केलेल्या उमेदवारांना भाजपने बळ दिल्याने विरोधक जोरदार टीका करीत आहेत. यामध्ये मंत्री महाजन यांच्यावरही आरोप केले जात आहेत.

पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालातून उत्तर देण्याचा मंत्री महाजन यांनी प्रयत्न केला. पक्षाच्या स्टार प्रचारकांनी नाशिकमध्ये येऊन प्रचार केला. हा प्रचार मर्यादित स्वरूपात झाला आहे. शहरावर इम्पॅक्ट होईल असे वातावरण भाजपला निर्माण करण्याचे आव्हान आहे. यादृष्टीने मंत्री महाजन यांच्या खांद्यावर सर्व उमेदवारांची भिस्त असेल.

शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसह अन्य यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभांचा समावेश आहे. अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे रोड शो होतील. या सर्व नियोजनात सध्या पडद्यामागे राहून गिरीश महाजन सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com