Eknath Shinde News: मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला डाव! लातुरातील 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

Latur Mahapalika nivadnuk 17 Independent Candidates Join Shiv Sena: लातुरमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. शिंदेंनी आपल्या पक्षातून लातूरमध्ये 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत.
Latur Mahapalika nivadnuk 17 Independent Candidates Join Shiv Sena
Latur Mahapalika nivadnuk 17 Independent Candidates Join Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Latur News: महापालिका निवडणूक निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातुरमध्ये मोठा धमाका केला आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 17 अपक्ष उमेदवारांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेत ओढले आहे.

मतदानापूर्वीच शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत मराठवाड्यात विरोधकांना धक्का दिला आहे. यामुळे लातुरमधील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. विरोधकांसमोर विजयाचे तगडे आव्हान उभे केले आहे.

लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. यातील काहीजण भाजपमध्ये, तर काहीजण स्वतंत्र निवडणूक लढवणारे तर काहीजण इतर पक्षात कार्यरत होते. या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्या सर्वांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने लातुरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे बोलले जाते. मतदानापूर्वीच लातुरमध्ये शिंदेंनी मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे.

17 अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदेच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. सगळ्या अपक्षांचे स्वागत करीत शिंदेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लातुरमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. शिंदेंनी आपल्या पक्षातून लातूरमध्ये 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत.

Latur Mahapalika nivadnuk 17 Independent Candidates Join Shiv Sena
Ladki Bahin Yojana: E-KYC ची मुदत संपली! तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 17 उमेदवार रिंगणात उतवले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहेत.तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 जागां जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. ठाकरेसेनाही स्वतंत्रपणे लढत आहे. भाजप सर्व 70 जागा स्वतंत्रपणे लढत आहे.

अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागावर मैदानात आहे. त्यांनी दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार दिले आहेत. काँग्रेस पक्षाने सर्व 70 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागेवर काँग्रेस आणि पाच जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहे.

'या' अपक्ष उमेदवारांनी घेतला शिवसेनेत प्रवेश

  • अजय गजाकोष

  • प्रशांत बिरादार

  • शोभा सोनकांबळे

  • श्रीकांत रांजणकर

  • मनोज जोशी

  • निलेश मांदळे

  • अर्चना कांबळे

  • प्रशांत काळे

  • ओमप्रकाश नंदगावे

  • राहुल साबळे

  • नरसिंह घोणे

  • उत्तमराव लोंढे

  • अन्य पदाधिकारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com