Nashik NMC Election : १९९७ पासून भाजपचा गड असलेल्या प्रभागात रंजना भानसी पुन्हा मैदानात, नवख्या गणेश चव्हाणांशी लढाई

Ranjana Bhansi Vs Ganesh Chavan : माजी महापौर व भाजपच्या उमेदवार रंजना भानसी या सहाव्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यांची लढत दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गणेश चव्हाण यांच्याशी होत आहे.
Ranjana Bhansi Vs Ganesh Chavan
Ranjana Bhansi Vs Ganesh Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : महापालिका निवडणुकीमध्ये एकूण चौदा लक्षवेधी लढती होणार आहे. त्यातील प्रभाग क्रमांक १ ब मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहाव्यांदा निवडणूक लढणाऱ्या माजी महापौर व भाजपच्या उमेदवार रंजना भानसी यांची लढत दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गणेश चव्हाण यांच्यात होत आहे. दुसरी लढत याच प्रभागात ड या सर्वसाधारण गटातील भाजपचे अरुण पवार विरुद्ध शिवसेनेचे प्रवीण जाधव यांच्यात होत आहे. पवार हे चौथ्यांदा निवडणूक लढत आहे. तर जाधव प्रथमच निवडणूक लढत आहे.

महापालिका निवडणुकीत चौदा लढतींकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक एक मधील लढत महत्त्वाची आहे. या प्रभागाने १९९७ पासून भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. रंजना भानसी अनुसूचित गटातून सहाव्यांदा येथून निवडणूक लढत आहे. स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सभापती पदाबरोबरच २०१७ मध्ये भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आल्यानंतर त्यांना महापौर पदाचा मान मिळाला आहे. त्यांची लढत शिवसेनेचे गणेश चव्हाण यांच्याशी होत आहे.

चव्हाण हे २०१२ मध्ये मनसेच्या लाटेत याच प्रभागातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप व शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन मतदारांसमोर जात आहे. केंद्रात व राज्यात दोन्ही पक्ष महायुती म्हणून सत्तेत आहे. परंतु, महापालिका निवडणुकीत मात्र दोघेही आमने-सामने आहे. विचार एक व लढ्या दोन असल्या तरी यापेक्षा अनेक वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंजना भानसी यांना चव्हाण पराभूत करतात की पुन्हा भानसी यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ टाकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पवार की जाधव?

प्रभाग १ या सर्वसाधारण गटात अरुण पवार भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यापूर्वी त्यांच्या पत्नी शालिनी पवार या दोनदा भाजप नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. कुटुंबाचा विचार केल्यास २००२ पासून पाचव्यांदा पवार कुटुंबीय निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांची लढत नवखे प्रवीण जाधव यांच्याशी होत आहे. जाधव शिवसेनेकडून लढत आहे. पवार कुटुंबीयांना मतदार पुन्हा महापालिकेच्या सभागृहात पाठविणार की नवख्या जाधव यांना संधी देतात याकडे नाशिककरांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com