Nashik NMC Election : जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंना भाजपने बालेकिल्ल्यातच चारली धूळ, सुनेचाही पराभव

BJP candidate defeat RPI leader Prakash Londhe : भाजपच्या उमेदवाराने आरपीआयचे नेते व उमेदवार प्रकाश लोंढे यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यांच्या सुनेचाही या निवडणुकीत पराभव झाला.
Prakash Londhe
Prakash LondheSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : गोळीबार व खंडणीच्या प्रकरणात सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला माजी नगरसेवक प्रकाश लोंढे उर्फ ‘बॉस’जेलमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांची स्नुषा दीक्षा लोंढे यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला.

प्रभाग क्रंमाक ११ जो लोंढे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातील गट ड मधून आरपीआय नेते प्रकाश लोंढे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा भाजपचे उमेदवार नितीन निगळ यांनी पराभव करत त्यांना बालेकिल्ल्यातच धूळ चारली. तर लोंढे यांच्या स्नुषा दीक्षा लोंढे या अ गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. भाजपच्या सविता काळे यांनी दीक्षा लोंढे यांना पराभूत केलं.

सातपूर विभागातील स्वारबाबानगर, प्रबुध्‌दनगर, सातपूर राजवाडा, सातपूर गावठाण परिसर हा प्रभाग ११ मध्ये येतो. रिपाइंचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेल्या प्रकाश लोंढे यांचा हा प्रभाग बालेकिल्ला मानला जातो. याच प्रभागातून यापूर्वी प्रकाश लोंढे हे चार वेळा निवडून आलेले आहेत. तर, त्यांची स्नुषा एक वेळेला निवडून आल्या. परंतु यंदा बालेकिल्ल्यातच लोंढे फॅमिलीची धूळधाण झाली.

Prakash Londhe
Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले भूषण व दीपक हे देखील तुरुंगात आहेत. खुनाच्या प्रयत्नासह अपहरण, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. लोंढे बापलेकांसह त्यांच्या टोळीवर नाशिक पोलिसांनी मकोकातंर्गत कारवाई केली असल्याने ते चार महिन्यांपासून नाशिक सेंट्रल जेलच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. असे असतानाही प्रकाश लोंढे यांनी कारागृहातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु जेलमध्ये असल्याने प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या मुलांना प्रचाराला येता आले नाही. दीक्षा लोंढे यांनी त्यांच्यापरीने प्रचार केला मात्र मतदारांनी त्यांना नाकारले.

Prakash Londhe
Nashik BJP : नाशिकमध्ये सर्वांधिक जागा मिळूनही गिरीश महाजन पूर्ण समाधानी नाही, कुठे कमी पडले?

कार्यालयात सापडले होते भुयार

याच प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात पोलिसांना भूयार सापडले होते. भुयारात दोन स्वतंत्र बेडरूम्स, हत्यारांचा साठा आणि महागड्या मद्याच्या बाटल्या सापडल्या. कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे, अशी हत्यारे, विदेशी ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या होत्या. या भुयाराचा वापर लोंढे गुन्हेगारीसाठी करत असल्याचे समोर आले होते. नाशिक पोलिसांनी लोंढे यांच्यावर कारवाई केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com