Himani Murder : 'अत्याचार, मारहाण आणि अंमली पदार्थ', हिमानीच्या पोस्टमॉर्टममध्ये धक्कादायक खुलासा

Himani Narwal Murder Case : काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आता हिमानीच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून तिच्या मृत्यूमागचे कारणं आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
Himani Narwal Murder Case
Himani Narwal Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Rohtak News : हरियाणातील रोहतक येथील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या त्यांच्याच घरात करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. ही माहिती तिच्या पोस्टमॉर्टममध्ये समोर आली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे तिच्यावर अत्याचार झाल्या असल्याची शक्यता आहे. तर तिला जबर मारहाण करण्यात आल्याचेही आता उघड झाले आहे. तथापि, व्हिसेरा आणि इतर नमुने मधुबन एफएसएल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक केली. ज्याचे नाव सचिन असून तो बहादूरगडचा रहिवासी आहे.

दोनच दिवसांपूर्वी (ता.1 मार्च) सकाळी रोहतक येथील सांपला शहरातील बस स्टँडजवळ एका बेवारस सुटकेसमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. तर तिचा हात सुटकेसमधून बाहेर आल्याने रस्त्याने जाणाऱ्यांना ते दिसले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पेलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला होता. त्यावेळी हा मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून काँग्रेस नेत्या हिमानी नरवालचा असल्याचे समोर आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

हिमानी नरवाल या काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ता होत्या. त्या पक्षाच्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत असत. काँग्रेस नेते राहुल गांध यांनी काढलेल्या 'भारत जोडो यात्रे' देखील त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांध यांच्याबरोबरचा त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.दरम्यान आता तिच्या हत्येनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून आमदार बीबी बत्रा यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

Himani Narwal Murder Case
Himani Narwal Murder Case News : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालणाऱ्या महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येनंतर, त्यांच्या कुटुंबाने तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. तर आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच काँग्रेस जर हमी देत असेल तरच आपण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेऊ अशी भूमीका घेतली होती. तर पोलिसांनी हिमानीच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नव्हते. यादरम्यान पोलिसांनी एकास दिल्लीतून अटक केली आहे.

अटक केलेल्या सचिन हिमानीचा ओळखीचा असून तो हिमानीच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच त्याच्या झडतीत पोलिसांना हिमानीचा मोबाईल फोनही मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणावरून सध्या राजकीय दबाव वाढत असल्याने पोलिसांनी डीएसपीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. जे आता 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले आहे.

Himani Narwal Murder Case
Himani Narwal : हाताला मेहंदी, गळ्यात ओढणी, सुटकेसमध्ये मृतदेह! कोण आहेत हिमानी नरवाल? काँग्रेसशी आहे कनेक्शन...

प्राथमिक शवविच्छेदन तपासणीच्या अहवालानुसार हिमानीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघड झाले आहे. तसेच सुटकेसमध्ये ठेवताना हिमानीचे हात आणि पाय मोडले होते. तिच्या तोंडात आणि नाकात रक्ताचे गुठळे झाले होते. हत्येपूर्वी तिला अंमली पदार्थ देण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून बलात्काराचीही अद्याप पुष्टी झालेली नाही. तथापि, व्हिसेरा आणि इतर नमुने मधुबन एफएसएल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Himani Narwal Murder Case
"Congress पक्षात माझी भूमिका काय?" नाराज शशी थरूर यांचा राहुल गांधींना एकच प्रश्न

आरोपीचा दावा

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने असा दावा केला आहे की तो हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तसेच तो आणि ती त्याला ब्लॅकमेल करत होती. शिवाय, लाखो रुपयेही उकळण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. तर तपासानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com