Gajanan Shelar Politics: निवडणुकीच्या तोंडावरच भाजपचा शरद पवारांच्या शेलार यांना धक्का, पुतण्याचा भाजप प्रवेश!

Nashik NCP Sharad Pawar Party Bablu Shelar BJP entry shock to Gajanan Shelar -बबलू शेलार यांनी ऐन निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतल्याने वेगळीच राजकीय चर्चा
Gajanan Shelar & Bablu Shelar
Gajanan Shelar & Bablu ShelarSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics News: भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची उमेदवारीसाठी दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने इच्छुकांना प्रवेश दिले जात आहेत. या प्रवेशांनी पक्षातील निष्ठावंतांसाठी भाजपचे इनकमिंग आता चर्चेचा विषय आहे.

भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एक धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या घरातल्या उमेदवारालाच भाजपने फोडले. त्यामुळे भाजपचे हे इनकमिंग चर्चेत आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी सोमवारी भाजप प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश अनेकांना धक्का देणारा आहे. यानिमित्ताने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या घरातच फूट पाडली. ही शेलार यांची राजकीय खेळी की भाजप आमदाराची सोय, यावरून गोंधळ आहे.

Gajanan Shelar & Bablu Shelar
Eknath Shinde Politics: संजय इंदुलकर यांच्या ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत झालेला भाजप प्रवेशाला मतदारांची नापसंती!

बबलू शेलार हे महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. या दरम्यान बबलू शेलार यांनी भाजप प्रवेश केला.

Gajanan Shelar & Bablu Shelar
Yeola NagarPalika Result : छगन भुजबळ रुग्णालयात, फायदा उठवण्यासाठी सरसावलेल्या दराडे बंधूंना समीर भुजबळ पुरून उरले : वारसदारावर शिक्कामोर्तब?

भारतीय जनता पक्षात स्वबळावर निवडणूक निवडणूक करण्याबाबत इच्छुकांचा दबाव आहे. इच्छुकांची गर्दी असल्याने महायुतीत जागावाटपात त्याचा अडथळा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी चर्चा लांबणीवर टाकत आहे.

महायुतीत इच्छुक आणि जागा वाटपाचा हा तिढा सुरू असतानाच अद्यापही इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. या प्रवेशांचा निवडणुकीत काय परिणाम होतो याचीही चर्चा या निमित्ताने होत आहे.

महाविकास आघाडीची निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशा स्थितीत जागा वाटपामध्ये या पक्षांत ओढाताण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यानेच भाजप प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निवडणूक तयारीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या कुटुंबातील आणखी काही सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या फोडाफोडीला पुन्हा एकदा गती आली आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com