Ajit Pawar News : अजित पवार गटाने आपलं दैवत बदललं? बॅनरवर शरद पवारांचा नव्हे यशवंतराव चव्हाणांचा फोटो झळकला...

Maharashtra Politics : संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली होती.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : ‘शरद पवार हे आमचे नेते व दैवत आहेत. आम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते असून तेच आमचे विठ्ठल आहेत. सगळ्या पालख्या या आमच्या विठ्ठलाकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे म्हणणाऱ्या अजित पवार गटाने आपले दैवत बदलल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकत होते. पवारांनी त्यांना तंबी दिल्यानंतर हे प्रमाण कमी झाले. पवारांऐवजी आता माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो अजित पवार गटाच्या बॅनरवर झळकला आहे.

Ajit Pawar News
Pune Politics : अजितदादा पालकमंत्री झाले, तरीही चंद्रकांतदादा म्हणतात, "कायद्यान्वये सहपालकमंत्री मीच..."

अजित पवार गटाकडून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानंतर अजित पवारांसोबत जाताना स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनीही शरद पवारांना दूर सारलेलं दिसत नव्हते. शरद पवारांचा फोटो त्यांच्या बॅनरवर असायचा. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो होते. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली होती.

"माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये," अशी तंबी शरद पवारांनी दिली होती.

अजित पवार हे आज (शनिवार) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात उभारण्यात आलेल्या बॅनरवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे. चव्हाण यांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री झाल्यावर नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. त्याच ठिकाणी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकपाठोपाठ अहमदनगरमध्येही शरद पवारांचे फोटो शुभेच्छा फलकावरून गायब झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोंना जागा मिळाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हे बॅनर लावले आहेत. त्यावर शरद पवारांचा फोटो नसून अजित पवारांसह भाजपच्या मंत्र्यांचे फोटो आहेत.

Ajit Pawar News
Sudhir Mungantiwar News : सरकारी योजनांच्या फलकावर झळकले मुनगंटीवारांचे बॅनर, आचारसंहितेची ऐशीतैशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com