Sudhir Mungantiwar News : सरकारी योजनांच्या फलकावर झळकले मुनगंटीवारांचे बॅनर, आचारसंहितेची ऐशीतैशी

Maharashtra Politics : आमदारकीचे डोहाळे लागलेल्या जिल्ह्याच्या एका पदाधिकाऱ्याने तर जिल्हाधिकारी परिसरातच शुभेच्छाचे बॅनर लावले आहेत.
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar News Sarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar News : नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीबाबत अभिनंदन करण्यासाठी समर्थक बॅनरबाजी नेहमीच करीत असतात. पण सरकारी कार्यालयातच मंत्र्यांचे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर समर्थकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लावले आहेत.

Sudhir Mungantiwar News
Maratha Reservation News : मराठा आरक्षण समिती आपल्या दारी; न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा मराठवाडा दौरा ठरला

सरकारी कार्यालयात जाहिरात करण्यास आचारसंहिता आहे. सर्वच राजकीय पक्षांना त्या आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. अशातच सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर जिल्ह्यातील एका भाजप पदाधिकाऱ्याने चक्क नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभेच्छाचे बॅनर लावले आहेत.

नुकतीच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पालकमंत्री यांची नियुक्ती होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक नेत्याची बॅनरच्या माध्यमातून स्पर्धा लागली आहे. अशातच आमदारकीचे डोहाळे लागलेल्या जिल्ह्याच्या एका पदाधिकाऱ्याने तर जिल्हाधिकारी परिसरातच शुभेच्छाचे बॅनर लावले आहेत.

नागरिकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सरकारी कार्यालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅनर लावणाऱ्या या नेत्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, हे आता येत्या काळातच कळेल.

Sudhir Mungantiwar News
Hemant Patil News : अटकेच्या भीतीने हेमंत पाटलांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; 'मला अटक करायची असेल, तर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP district executive suspension; Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar in Assembly
FDA officials led by Commissioner Tukaram Mundhe during action against the Wardha Goras Bhandar dairy unit, where stock worth over ₹25 lakh was seized.
Model Code of Conduct
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com