Nashik News : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतांसाठी तांबेंची धावाधाव, शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांचाही पाठिंबा

Satyajeet Tambe : आमच्या परिवाराला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं होतं...
satyajeet tambe, kapil patil
satyajeet tambe, kapil patil Sarkarnama

Nashik Graduate Constituency : महाविकास आघाडीनं एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याचवेळी शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीनं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे नाशिकची निवडणुकीत रंगत वाढली आहे.

शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्यजित तांबे, त्यांचे वडील सुधीर तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पाटील जाहीर केला आहे.

सत्यजित तांबे म्हणाले, कपिल पाटील हे अशावेळी स्वत: हून मदतीला धावून आले ज्यावेळी आमच्या परिवाराला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं होतं. कपिल पाटील यांनी आम्हांला स्वत:हून पाठिंबा दिला. ही गोष्ट मी कधीही विसरणार आहे. माझ्या २२ वर्षांपासून पक्ष, संघटनेच्या माध्यमातून राज्य, देश पातळीवर काम करतो आहे.

satyajeet tambe, kapil patil
Latur Political : वाडा हलतं नसतो, त्यातली माणसं हलतात ; निलंगेकरांचा टोला..

कपिल पाटील तर माझ्यासाठी विधानसभा मतदारसंघ शोधत होते. अनेकवेळा आमच्या याबाबत चर्चा देखील होत होत्या. पण शेवटी राजकारण असतं. खूप राजकारण झालं. ते किती असतं हे आपण सर्वांनी मागील चार ते पाच दिवसांत पाहिलं आहे. त्यावर मी योग्यवेळी नक्की बोलेन. आता त्यावर मी आत्ता काही भूमिका मांडणार नाही.

सुधीर तांबे यांनी नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात मागील १४ ते १५ वर्षांच्या कालावधीत जे समाजातील पदवीधर घटकांसाठी काम करताना शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचं प्रश्न, महाविद्यालयं, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा, तसेच दिव्यांग क्षेत्रातल्या विविध प्रश्नांवर काम केलं ते आणखी जोमाने करेल याची खात्री देतो.

satyajeet tambe, kapil patil
Pune News : मोठी बातमी : मंगलदास बांदल यांना पावणेदोन वर्षांनी जामिन मंजूर

कपिल पाटील म्हणाले की आता आपण एकत्र काम करु पण माझी आंदोलनातून तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. माझी सुरुवात विद्यार्थी चळवळीतून सुरु झाली. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी स्वत:च्या सरकार आणि मंत्र्याविरुद्ध आंदोलनं केलं आहे. मुद्दा, प्रश्न कसा सोडवायचा याचं ज्ञान मागील २२ वर्षांच्या चळवळी, आंदोलनातून आलं आहे.

कपिल पाटील काय म्हणाले..?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना शिक्षक भारती बिनशर्त पाठिंबा देत आहेत. अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर तांबे हे कुठल्या पक्षात जाणार आहेत याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. पण अपक्ष हे कुठेही जात नाही. ते अपक्ष राहूनच सत्ताधार्यांवर दबाव निर्माण करत असतात. मात्र, सत्यजित बाबत पक्षाने अशी भूमिका का घेतली हे समजलं नाही. तसेच पक्षातंर्गत राजकारणावर मला भाष्य करायचा अधिकारही नाही. परंतू, त्यांच्या पक्षानं आपली चूक सुधारावी आणि या तरुण नेत्याला संधी द्यावी. असेही पाटील यावेळी म्हणाले.

सत्य परेशान हो सकता है,पराजित नाही. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजितचाच विजय होणार आहे असा आत्मविश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com