Nashik Politics : भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले; अजितदादांच्या राष्ट्रवादीला दिला स्पष्ट संदेश!

BJP sends clear message to Ajit Pawar NCP in Nashik : महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महापालिकेतील गटाचे मुकेश शहाणे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे दोन सदस्य त्यांना पाठिंबा देतील असे गृहीत होते.
Nashik political strategy by BJP latest update
Nashik political strategy by BJP latest updateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 26 Feb : महापालिका स्थायी समितीची निवडणूक नाशिकच्या राजकारणाला वेगळा संदेश देणारे ठरली आहे. सभापतीपद भाजपच्या पारड्यात आणि बिनविरोध आले. मात्र हे करताना त्यांनी विरोध करणाऱ्यांना उपेक्षेने मारले.

स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवडून आले. त्यासाठी त्यांच्याकडे प्रबळ संख्या बळ होते. मात्र पडद्याआडून काही चमत्कार करता येईल का याचा प्रयत्न विरोधकांनी केला, हे लपून राहिले नाही.

महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महापालिकेतील गटाचे मुकेश शहाणे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे दोन सदस्य त्यांना पाठिंबा देतील असे गृहीत होते. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मधाचे बोट लावता येईल का याचा आटोकाट प्रयत्न शहाणे यांनी केला.

एरवी महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना स्पॉन्सर करणाऱ्यांशीही त्यांनी चर्चेचा प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसात त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्यांपासून तर शहरातल्या विविध राजकीय घटकांची संपर्क केला. भाजपवर राजकीय दबाव आणणे हा त्याचा हेतू होता.

Nashik political strategy by BJP latest update
Marathi School : '255 मराठी शाळा बंद तर 2 हजार अडचणीत; शिक्षक बेरोजगार होतील, मराठी भाषा चिरायू होवो, पण...'

प्रत्यक्षात मात्र स्थायी समितीची सर्व सूत्रे पडद्या मागून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. त्यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केलेल्या शहाणे यांच्याशी भाजपच्या कोणीही चर्चा करू नये, अशी सूचना केल्याचे कळते. त्यामुळे माघारीसाठी काही तडजोड होईल हा प्रयत्न अयशस्वी झाला.

स्थायी समितीच्या निवडणुकीत प्रभागातील विकास कामे डोळ्यापुढे ठेवून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही भाजपला आतून सहकार्याचा संदेश दिला होता. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे स्थायी समितीच्या निवडणुकीत काही सूचना करते अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

Nashik political strategy by BJP latest update
Vanraj Andekar Case : 'बहीण संजीवनी कोमकर, अतिक्रमण अन् सोम्या...' वनराज आंदेकरच्या हत्यमागची 'ती' 3 प्रमुख कारणे वकिलांनी न्यायालयात सांगितली

प्रत्यक्षात यातील कोणीही मुकेश शहाणे यांचा विषय गांभीर्याने घेतला नाही. परिणामी सत्ताधारी भाजप बरोबरच स्वपक्षाच्या नेत्यांनीही स्थायी समितीची निवडणूक गांभीर्याने न घेतल्याने उमेदवारी अर्ज भरलेल्या शहाणे यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस आधीच संकेत दिले होते.

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत सरकारनामाला काय घडणार हे आधीच क्लियर केले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या राजकारणात अति उत्साही नगरसेवकांची झालेली कोंडी आगामी राजकारणासाठी सूचक मांडली जाते. महायुतीत असूनही महायुतीचे नेते या पक्षाला महापालिकेच्या कारभारात किती गांभीर्याने घेणार हा उत्सुकतेचा विषय असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com