Nashik NMC Politics: भाजप नगरसेवकांवरील टक्केवारीचा आरोप; गिरीश महाजन यांनी दिला 'हा' इशारा...

Nashik NMC Commission issue BJP corporator minister Girish Mahajan warns to Corporators -सिंहस्थ कुंभमेळ्याचा विकास कामांबाबत घडलेला प्रकार खपवून घेणार नाही
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पंचवटी येथील रस्त्याच्या कामात नगरसेवकांनी अडथळे आणले. याबाबत टक्केवारीचा आरोप होत आहे. त्यात थेट भाजप नगरसेवकांवरच आरोप झाले. 

सत्ताधारी भाजपच्या तीन नगरसेवक आणि दोन झेरॉक्स नगरसेवकांची याबाबत चौकशी झाली. पोलिसांनी या नगरसेवकांचा दोन तास समाचार घेतला. समाज माध्यमांवर कोणत्याबाबत सत्ताधारी भाजपवर चांगलीच टिका झाली.

ही कामे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आहेत. संबंधित कंत्राटदाराने लिखित स्वरूपात तक्रार केली. त्यामुळे हा प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचला. 

Girish-Mahajan
Nashik NMC Politics: टक्केवारीचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांना झोंबला; स्थायी समितीच्या बैठकीत प्रसाद!

याविषयी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही अतिशय स्पष्ट शब्दात संबंधित नगरसेवकांना सुनावले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात कोणतीही गुणवत्तेविषयी तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे याबाबत सगळ्यांनीच सावध राहिले पाहिजे. 

Girish-Mahajan
Nashik NMC News: महापालिकेत सुरू झाला टक्केवारीचा खेळ?, त्रस्त ठेकेदार पोहोचले थेट आयुक्तांच्या दारी!

कुंभमेळ्याची कामे थेट मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत संबंधितांना सूचना केले आहेत. ही तक्रार प्राप्त झाल्यावर थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सूचना केल्याचे, महाजन म्हणाले.

नगरसेवकांबाबत तक्रार आल्यावर मी तातडीने त्याची माहिती घेतली आहे. असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही. संस्थाच्या कामात अडथळे आणण्याचे धंदे कोणीही करू नये, या शब्दात महाजन यांनी समाचार घेतला. 

संबंधित नगरसेवकांनी पाण्याच्या तुटवड्या बाबत तक्रार केली आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे आपण त्याच्याशी संपर्क केल्याची नगरसेवकांनी सांगितले. यातील सत्यता जाणून घेणार आहे. 

हा प्रकार गंभीर असल्याने त्याबाबत लवकरच पुढील कारवाई होईल. नगरसेवक महापालिका आयुक्त आणि पोलीस यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यात या विषयावर चर्चा करू, असेही कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सांगितले. 

एकंदरच महापालिकेच्या नगरसेवकांची टक्केवारीची चर्चा सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात हा प्रकार घडला. त्यामुळे शहरभर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तो चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांचा इशारा गंभीर मानला जातो. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com