Sunil Tatkare Politics: ‘त्या’ महिला उमेदवार थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनाच भिडल्या; या कारणाने रंगला निवडणुकीतच राष्ट्रवादीत वाद?

Nashik NMC election: Ajit Pawar NCP Sunil Tatkare withdrawal order to candidates in controversy-महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक निर्णय चांगलाच वादाचा विषय ठरला आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC Election News: नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एक निर्णय वादाचा विषय ठरला. या निर्णयाने उमेदवार आणि पक्ष यांच्यातच नवा वाद निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र दिले. त्यामध्ये पक्षाच्या चार उमेदवारांनी माघार घेण्याचे आदेश दिले. प्रभागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे निर्देश देण्यात आले.

निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना सुनील तटकरे यांनी काढलेले हे आदेश नवा वाद निर्माण करून गेले आहेत. या उमेदवारांनी माघार घेण्याऐवजी थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले आहे. आमच्या माघारीचे आदेश हा आमच्या विरोधकांच्या कटकारस्थानाचा भाग आहे, असा दावा या उमेदवारांनी केला.

Sunil Tatkare
Saroj Ahire Politics: ‘या’ प्रभागात सुरू आहे विधानसभेचा संघर्ष; उमेदवारांपेक्षा आमदार सरोज अहिरेंचीच प्रचारात आघाडी!

महापालिका प्रभाग एक मधील उमेदवार वंदना पेलमहाले यांनी थेट तटकरे यांनाच आव्हान दिले. मंगळवारी त्यांनी आपल्या प्रभाकर शक्ती प्रदर्शन करीत प्रचार फेरी काढली. माघार घेण्याचा कोणताही निर्देश आपण पाळणार नाही असे ठाम सांगितले.

Sunil Tatkare
Navapur Politics: भरत गावित, चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले भाजपला आव्हान, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच जाहीर करीत दिला विजयकुमार गावित यांना संदेश!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वंदना तेल महाले विजय अहिरे जीवन रायते आणि शेखर देवरे या चार उमेदवारांची माघार घेत असल्याचे पत्र काढले होते. सुनील तटकरे यांनी या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे निर्देश दिले होते. निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती आहे.

मात्र अनेक ठिकाणी युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्येच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्षांचे काही उमेदवार एकमेकांच्या विरोधात शक्ती प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे युती कितपत फलदायी ठरली, पक्षाचे आदेश उमेदवार कितपत पाळतात हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बाबत शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी थेटर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदेश दिले. मात्र उमेदवार प्रचारात बरेच पुढे गेले असल्याने, त्यांनी आता थेट तटकरे यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील हा वाद चांगलाच रंगला.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com