NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात, भाजपचा ‘हंड्रेड प्लस’ नारा पोकळ ठरणार!

Nashik NMC Election NCP Sharad Pawar's party will not go with BJP after the elections-शहरातील मतदार भाजपवर नाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भाजपशी निवडणुकीनंतर कदापी आघाडी नाही
sharad-pawar-ajit-pawar
sharad-pawar-ajit-pawarSarkarnama
Published on
Updated on

Gokul Pingale News: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. निवडणुकीनंतर तसा प्रयोग नाशिकमध्येही होऊ शकतो. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर वेगळी समीकरणे निर्माण होतील.

नाशिक महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचा भाग आहे. या पक्षामुळे भाजपला पर्याय मिळाल्याचा दावा नेत्यांनी केला आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी याबाबत दावा केला आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. पवार कुटुंब एकच आहे. भविष्यात देखील ते एकत्र येतील. तसे झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे पिंगळे म्हणाले.

sharad-pawar-ajit-pawar
BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

गेली दहा वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमुळे नाशिकचा विकास खुंटला आहे. रस्ते, प्राथमिक सुविधा आणि अनेक समस्या अत्यंत बिकट झाले आहेत. नागरिक त्यावर प्रचंड नाराज आहेत.

sharad-pawar-ajit-pawar
Sameer Bhujbal Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीने केली भाजपची कोंडी; शहराच्या विकासात अपयशी ठरल्याचा आरोप

मतदारांतील नाराजीचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. त्यामुळे भाजपचे ‘हंड्रेड प्लस’ हे उद्दिष्ट कदापि साध्य होणार नाही, असा दावा पिंगळे यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडी सत्तेत यावी यासाठी प्रयत्न करेन. विरोधकांना एकत्रित करून आघाडी स्थापन करण्यात येईल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाजपला ‘हंड्रेड प्लस’ हे उद्दिष्ट कदापी साध्य करता येणार नाही, असा दावा पिंगळे यांनी केला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र सत्ताधारी भाजप सिंहस्थ कुंभमेळा ऐवजी वेगळ्याच कामांना प्राधान्य देत आहे. कोणात वृक्षतोड करीत आहे. त्यांची ही कृती नाशिककरांना नाराज करणारी ठरली आहे. त्याचा मोठा फटका महापालिका निवडणुकीत भाजपला बसेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com