BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

Ahilyanagar Municipal Polls: BJP Sujay Vikhe Hints at Lok Sabha Plans : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेतील पराभव भाष्य करताना, 'अहमदनगर' नावाने पराभव झाल्याचे म्हटले आहे.
BJP Sujay Vikhe
BJP Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात चांगलेच सक्रिय झाले आहे. परंतु यानिमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीची चाचपणी त्यांनी सुरू केल्याचे संकेत मिळाले आहेत.

"माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार आहे. पराभव झाला तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही. आजही नगरमध्ये प्रचाराला गेल्यावर लोक ‘खासदार’ म्हणूनच हाक मारतात, हे आपल्या कामातून कमावलेले भांडवल आहे," असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप (BJP) मंत्री पंकजा मुंडे यांचा सावेडी उपनगरात युतीच्या प्रचाराच्या उमेदवारांसाठी रोड-शो झाला. यात सुजय विखे पाटील सक्रिय होते. युवा पदाधिकारी अक्षय कर्डिले देखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. तत्पूर्वी सुजय विखे पाटील यांची उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. यात त्यांनी अहिल्यानगर शहराच्या विकासावर भाष्य करताना, लोकसभा निवडणुकीचा पुन्हा तयारी सुरू असल्याचे संकेत दिले.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "विकासाच्या मुद्द्यावरच थेट जनतेसमोर जाणार असून ही भूमिका कोणाच्या विरोधासाठी नाही, तर लोकांशी संवाद साधून विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहे. पराभव झाला तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही. आजही अहिल्यानगरमध्ये प्रचाराला गेल्यावर लोक ‘खासदार’ म्हणूनच हाक मारतात, हे आपल्या कामातून कमावलेले भांडवल आहे." आज बाजारपेठेत प्रचार रॅली काढत असताना व्यापारी म्हणाले काही झाले तरी पुढचे खासदार तुम्हीच, अशी भावना व्यक्त केल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

BJP Sujay Vikhe
Tushar Apte : भाजपचे 'सत्तेसाठी काहीही'; AIMIM अन् काँग्रेसबरोबर युती, तर लैगिंक अत्याचारातील सहआरोपीला संधी...

'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो, याचे उदाहरण देताना MIDC चौकात दोन फ्लायओव्हरचे काम सुरू असून लवकरच नवीन विळद इथंही MIDC उभारली जाणार आहे,' अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

BJP Sujay Vikhe
RJD internal conflict : 'यादवी' पुन्हा उफाळली, लालुजींच्या कन्या रोहिणी आचार्य पुन्हा 'घरचा आहेर'

'आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजच खऱ्या अर्थाने विकास करू शकतो, असे नमूद करत त्यांनी राजकारणातील दुटप्पीपणावरही टीका केली. गरीब म्हणून मते मागायची आणि निवडून आल्यानंतर टक्केवारी घ्यायची प्रवृत्ती बदलली पाहिजे, असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले. आज राजकीय परिस्थितीत कोण कोणाबरोबर आहे हे स्पष्ट नसले, तरी विकासासाठी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे,' असेही ते म्हणाले.

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या नव्याने विकसित होत असलेल्या चारही उपनगरांसाठी पुढील काळात एकत्रितपणे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून शहराच्या तोडीस तोड सर्वांगीण विकास करण्याचा ठाम संकल्प करण्यात येत असल्याचे माजी खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com