Shiv Sena MNS News: एबी फॉर्मचा गोंधळ भाजपच्या गळ्याशी आला आहे. यामध्ये शिवसेना आणि मनसे हे देखील मागे नाहीत. ठाकरे बंधूंची युती असताना नाशिकमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. त्या आधीच नाशिकमध्ये या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. या युतीचे नाशिकमधील नेत्यांनी उत्साहाने स्वागत केले.
महापालिका निवडणुकीच्या जागावाटपानंतर मात्र शिवसेना आणि मनसेमध्ये एक नवा वाद उभा राहिला आहे. जागावाटप झाल्यानंतर एबी फॉर्म वाटपात शिवसेनेने मनसेच्या प्रभागात उमेदवारी दिल्याचे उघड झाले आहे. उमेदवारी अर्ज छाननीतून हा गोंधळ उघड झाल्याने मनसेच्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. शिवसेना आणि मनसेची नाशिक मध्ये युती झाली आहे. मात्र जागावाटप सामोपचाराने झाल्यावर एक नवा वाद उभा राहिला आहे.
महापालिका जागावाटपत महाविकास आघाडीत शिवसेना मनसे हे प्रमुख पक्ष आहेत. शिवसेनेने ८० तर मनसेने ३४ जागांवर उमेदवार देण्याचे सूत्र ठरले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांना प्रत्येकी १३ जागा देण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज छाननीतून मात्र शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये विसंवाद असल्याचे पुढे आले. मनसेला देण्यात आलेल्या प्रभागात अनेक ठिकाणी शिवसेनेने एबी फॉर्मचे वाटप केले आहे. नऊ प्रभागांमध्ये असा गोंधळ झाल्याचे छाननीत उघड झाले.
शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी मनापासून एकत्र आल्याचे सांगितले होते. अध्यक्ष निवडणुकीत मात्र हा एकोपा विस्कळीत झाल्याचे उघड झाले. प्रभागांमधून मनसेच्या उमेदवारांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेना मनसे एकमेकांविरोधात शह काटशहाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट झाले.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. जागावाटप झाल्यानंतरही परस्परांविरुद्ध असलेल्या उमेदवारांची माघार होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी आज नेत्यांना यावर तोडगा काढावा लागेल. हा तोडगा न निघाल्यास भाजपच्या पराभवासाठी एकत्र आलेल्या शिवसेना मनसे एकमेकांच्या पराभवासाठी मैदानात उतरेल असे चित्र आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.