Shivsena UBT Politics: ठाकरेंच्या गटनेतेपदी निष्ठावंत केशव पोरजे; शिवसेना महापालिकेत आक्रमक होणार!

Nashik NMC Election Shiv Sena Uddhav Thackeray Party Keshav Porje will be leader-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची गट नोंदणी झाल्याने पुढील भूमिकेची उत्सुकता
Shivsena Corporators & Keshav Porje
Shivsena Corporators & Keshav PorjeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Shivsena News: महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी गट नोंदणी पूर्ण केली.

नाशिक महापालिकेत महायुतीच्या घटक पक्षांकडे शंभराहून अधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला विरोधात बसावे लागणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नाशिक महापालिकेची गट नोंदणी गुरुवारी करण्यात आली. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत नोंदणी झाली. गटनेतेपदी दुसऱ्यांदा निवडून आलेले व निष्ठावंत केशव पोरजे यांची निवड करण्यात आली.

Shivsena Corporators & Keshav Porje
ZP Election: महायुतीत बिघाडी; राज्यमंत्र्यांच्या विरोधात सर्वपक्षीय ठाकले उभे

यावेळी संपर्क नेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपकडून एककल्ली कामकाज होते. शहराच्या अनेक समस्या अधिक प्रबळ झाल्या आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक विरोधकांची भूमिका बजावेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येईल, असे यावेळी पोरजे यांनी सांगितले.

Shivsena Corporators & Keshav Porje
Shivsena UBT News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपचा झंजावात रोखून मुलासाठी होम ग्राउंड वाचवले!

महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक ७२ नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे २९ नगरसेवक असल्याने ते सत्तेत सहभागी होणार की विरोधकांची भूमिका बजावणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालामुळे बहुतांशी नगरसेवक देवदर्शनाला आणि पर्यटनाला शहराबाहेर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप दोन्हींच्या नगरसेवकांची बैठक झालेली नाही. त्यामुळे महापौर कोण आणि त्याचे नाव निश्चित करण्याची प्रक्रिया कशी होणार हे अधांतरी आहे.

येत्या दोन दिवसात भाजप महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग होत आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर महापालिकेच्या कामकाजा संदर्भात या पक्षांची भूमिका काय? याची उत्सुकता कायम आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com