NMC BJP Politics: महापालिका सभागृह नेते पदासाठी भाजपचा शोध बनला कठीण?, निष्ठावंत आग्रही, आयात नेत्यांची फिल्डिंग!

BJP search for municipal house leader difficult: सभागृह नेते पदासाठी भाजप पक्षनिष्ठेला प्राधान्य देणार की अनुभवी आयात उमेदवारांना संधी?
Sudhakar-Badgujar, Gurmitsingh Bagga & Girish Mahajan
Sudhakar-Badgujar, Gurmitsingh Bagga & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर भाजप पुढे नवा पेच आहे. पक्षातील जाणते नगरसेवक पराभूत झाल्याने समस्या उद्भवली आहे. सभागृह नेते पदाची घोषणा उद्या होणार की लांबणीवर पडणार याची चर्चा आहे. 

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एकत्र आला आहे. त्यामुळे त्यांनी १२२ पैकी नगरसेवकांची शंभराहून अधिक संख्या ओलांडली आहे. महापौरपदी हिमगौरी अडके तर उपमहापौर पदी विलास शिंदे यांची निवड झाली. 

महापालिकेचा कारभार हाताळण्यासाठी विरोधी पक्षनेता आणि सभागृहनिता ही दोन महत्त्वाची पदे असतात. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेता म्हणून शिफारस केली आहे. उद्या होणाऱ्या महासभेत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. 

Sudhakar-Badgujar, Gurmitsingh Bagga & Girish Mahajan
Kirit Somaiya Politics: महापौर नसरीन बानो यांचा किरीट सोमय्यांना दणका; बांगलादेशी वादाची वात पुन्हा पेटवली!

भाजप आणि शिवसेना युतीपुढे सभागृहातील आणि सभागृहाबाहेर कामकाज पाहण्यासाठी सभागृह नेते हे महत्त्वाचे पद कोणाला? हा मोठा विषय आहे. सध्या या पदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून आलेले सुधाकर बडगुजर आणि काँग्रेस मधून भाजप प्रवेश केलेले गुरमीत बग्गा ही नावे आघाडीवर आहे. दिनकर पाटील आणि शाहू खैरे हे अन्य दोघे देखील इच्छुक आहेत. 

Sudhakar-Badgujar, Gurmitsingh Bagga & Girish Mahajan
Police Crime: पोलीस लूट; १.३३ कोटींचा अपहार करणारा उपनिरीक्षक वाघ का पकडला गेला नाही?

सभागृह नेते हे महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आधार आणि दिशादर्शन करणारे पद असते. त्यासाठी महापालिकेचे नियम आणि कामकाजाचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो. त्या दृष्टीने अन्य पक्षातून आलेले नगरसेवक आघाडीवर आहे. 

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांत दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, सतीश सोनवणे, शिवाजी गांगुर्डे, हे अनुभवी नगरसेवक पराभूत झाले आहेत. त्यामुळे पक्षाला सुधाकर बडगुजर, गुरमीत सिंग बग्गा आणि अन्य नेत्यांकडे पर्याय म्हणून पहावे लागत आहे. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. सध्या तरी महाजन यांच्याशी सुधाकर बडगुजर यांची जवळीक आहे.

महापालिकेतील हाऊस मॅनेजमेंट आणि प्रशासनाशी समन्वय याबाबत श्री. बडगुजर हे प्रभावी नगरसेवक मानले जातात. उपस्थितीत भाजपला निष्ठावंत नगरसेवकाला सभागृह नेते म्हणून नियुक्त करण्याची संधी जवळपास नाही. त्यामुळे ऐनवेळी काही चमत्कार झाला तरच निष्ठावंताला या पदावर संधी मिळेल.

उद्या महापालिकेची महासभा होणार आहे. त्यात या पदांची घोषणा होऊन आगामी कामकाजाला रीतसर मार्ग मोकळा होणार आहे. त्यादृष्टीने भाजप सभागृह नेते पदासाठी निष्ठावंतांना पुढे करणार की आयारामांना पायघड्या अंथरणार याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com