Police Crime: पोलीस लूट; १.३३ कोटींचा अपहार करणारा उपनिरीक्षक वाघ का पकडला गेला नाही?

Jalgaon police Crime Valmik Wagh 1.33 Cr fraud police order audit & Inquiry- पोलीस उपनिरीक्षक वाघ सातत्याने साईड ब्रांचला राहून करीत होता हे उद्योग!
Jalgaon Police_News.
Jalgaon Police_News.Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News: जळगावच्या पोलीस वेल्फेअर समितीचा पेट्रोल पंप केले वीस वर्ष सुरू होता. मात्र या कालावधीत या पंपावर कोणत्याही तक्रारी नव्हत्या. नुकतीच झालेली कोट्यावधींची लूट होण्याचे कारण चर्चेचा विषय आहे.  

पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांनी जळगाव पोलीस वेल्फेअर समितीच्या पंपाची रोकड लांबवली. त्याने १.३३ कोटी रुपयांचा अपहार केला. मात्र त्याच्यावर कोणालाच संशय आला नव्हता, हे विशेष 

पोलीस वेल्फेअर पंपाचे १.३३ कोटी रुपये अपहार करूनही उपनिरीक्षक वाघ मोकळा कसा? याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाघ याची कार्यपद्धती त्याला कारणीभूत होती. वाघ हा सातत्याने साईड ब्रांचला होता . त्यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Police_News.
Tribal Politics: मंत्री अशोक उईके यांचा शब्द ठरला बुडबुडा, संतापलेल्या आदिवासींचा पुन्हा बिऱ्हाड मोर्चा?

पोलीस उपनिरीक्षक वाघ हा सातत्याने आपल्या विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना खुश ठेवत होता. कर्मचाऱ्यांना काय हवे? काय नको? याची त्याला कल्पना होती. मुळे विभागातील सर्वच त्याच्यावर खुश होते. अपहारामागील कारण हे तर नसावे? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Jalgaon Police_News.
Kirit Somaiya Politics: महापौर नसरीन बानो यांचा किरीट सोमय्यांना दणका; बांगलादेशी वादाची वात पुन्हा पेटवली!

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक वाघ गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याने पंपाच्या रकमेतील १.३३ कोटींचा हिशेब जुळत नसल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी खास पथक तयार केले आहे.  

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. जानेवारी महिन्यात दक्षता पंपाच्या तपासणीसाठी आणि लेखापरीक्षणासाठी पथक गेले होते. मात्र त्यांनी प्राथमिक माहिती घेऊन लेखापरीक्षणासाठी पुढील तारीख निश्चित केली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला नसावा, असे त्यांनी सांगितले. 

यासंदर्भात पोलीस कल्याण विभागाची जबाबदारी असलेल्या पोलीस निरीक्षकावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाल्मीक वाघ याचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही तणावाखाली आहेत. या विभागाचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर आता कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com