Nashik Politics: महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस; शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला चौदावा बळी!

Nashik NMC Simhastha Kumbh Mela Road Pothole Accident Fourteenth Death Angry-महापालिका रस्त्यांच्या कामांमुळे निम्म्याहून अधिक शहर बंद तर रस्ते झाले धोकादायक
NMC Road Accidents Death
NMC Road Accidents DeathNMC Road Accidents Death
Published on: 
Updated on: 

NMC Accident Politics: महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्क्रियतेचा कळस झाला आहे. शहरातील निम्म्याहून अधिक रस्ते कामांमुळे नादुरुस्त अवस्थेत आहेत. याबाबत तक्रारी करूनही कंत्राटदार आणि प्रशासन कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. 

शहरातील निम्म्याहून अधिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अर्धवट स्थितीत कामे सोडून दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या या विषयावरून चांगलीच जुंपली आहे. 

शहरातील राजीव नगर भागात बुधवारी रस्त्यात मधोमध खोदलेल्या खड्ड्यामुळे गंभीर अपघात झाला. प्रकाश किसनराव वंडेशकर (वय ६१) या खड्ड्यात दुचाकीसह पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

NMC Road Accidents Death
Nashik NMC Corruption : भाजप बॅकफूटवर! शिंदेंच्या शिवसेनेकडून महापालिकेतील भ्रष्टाचार उघड! नगरसेवक कैलास मुदलियार यांनी लेखाजोखा मांडला

शहरातील रस्ते खोदून ठेवून त्याबाबत फलक अथवा नागरिकांना अलर्ट करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे झालेल्या अपघातांमुळे हा चौदावा मृत्यू आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका प्रशासना विरोधात मोर्चा काढून आंदोलन केले होते. 

NMC Road Accidents Death
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या कामांना सरकारचा ‘बूस्टर’ ; आणखी 1800 कोटींचा निधी, नगरविकास विभागाकडून घोषणा

शहरातील निम्म्याहून अधिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अर्धवट स्थितीत कामे सोडून दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या या विषयावरून चांगलीच जुंपली आहे.  

शहरातील राजीव नगर भागात बुधवारी रस्त्यात मधोमध खोदलेल्या खड्ड्यामुळे गंभीर अपघात झाला. प्रकाश किसनराव वंडेशकर (वय ६१) या खड्ड्यात दुचाकीसह पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

शहरातील रस्ते खोदून ठेवून त्याबाबत फलक अथवा नागरिकांना अलर्ट करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे झालेल्या अपघातांमुळे हा चौदावा मृत्यू आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका प्रशासना विरोधात मोर्चा काढून आंदोलन केले होते. 

नागरिकांमध्ये या अपघातांबाबत संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट केले आहे. याबाबत महापौर हिमगौरी अडके आणि पालकमंत्री गिरीशओ महाजन यांच्यावर शिवसेनेने टीका केली होती. त्यानंतरही उपायोजना झालेली नाही. 

या संदर्भात महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. महासभा आणि महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे नगरसेवकांनी तक्रारी करू नये अपघातांचे सत्र सुरूच आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com