Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या निर्णयावर नाराज, नाशिकचे तीनही खासदार थेट फडणवीसांकडे तक्रार करणार

MPs from Nashik to meet Chief Minister : जिल्हा नियोजन समितीच्या निधीत नाशिक जिल्ह्यातील तीन्ही विरोधी पक्षातील खासदारांना ठेंगा मिळाला आहे. त्यामुळे तीन्ही खासदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व आमदारांना समान निधीचे वाटप करण्यात आले आहे. परंतु विरोधी पक्षातील तीन्ही खासदारांना पूर्णपणे डावलण्यात आले असून एक रुपयाचाही निधी न दिल्याने विरोधी तीन्ही खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

शासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या योजनांसाठी 270 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वार्षिक नियोजन हे सुमारे 900 कोटींच्या जवळपास जाते. या सर्व निधीचे नियोजन पालकमंत्र्यांकडून होत असते. परंतु नाशिक जिल्ह्याला आजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थिती जिल्हा नियोजन विकास मंडळाचा अधिकार अर्थमंत्र्यांकडे जातो.

त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत निधीचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत सर्व आमदारांना समान निधी देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व 15 आमदारांनी समान निधी प्राप्त झाला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Khadse : अजित पवार गटाला खडसे एकटे नडताय ; जिल्हा बँक भरती आणि दगडी बँक प्रकरण गाजतेय

परंतु नाशिक जिल्ह्याला निधी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील तिन्ही खासदारांना वगळले आहे. जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव या तीन्ही विरोधी पक्षांच्या खासदारांना एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.

विरोधी तीन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातील तिन्ही खासदारांना निधी मिळालेला नाही. राज्यभरातील खासदारांची अशीच स्थिती असल्याने सर्व खासदार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. येत्या आठवडाभरात त्यांची वेळ घेण्यात येणार असल्याचे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Nashik Kumbh Mela : मंत्र्यांना निमंत्रण मात्र कुंभमेळा बैठकीला मुख्यमंत्री जिल्ह्यातील आमदारांना पुन्हा विसरले!

उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने ते स्व पक्षाच्या आमदारांना निधी देतात असा आरोप महायुतीमधीलच घटक पक्षांमधील आमदारांनी यापूर्वी केला होता. त्यात आता नाशिकच्या तीन्ही खासदारांनीही फडणवीस यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने तीन्ही खासदार अजित पवारांबाबत देखील तक्रार करु शकतात. त्यामुळे हा विषय वादाचा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com