Nashik Police : कायद्याच्या बालेकिल्ल्याचा राज्यभर डंका, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिकांची कामगिरी ठरली नंबर वन

Nashik Police Commissioner Sandeep Karnik :150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालय या संवर्गात नाशिक पोलिस आयुक्तालय सर्वोत्कृष्ट कार्यालय ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच विजेत्यांची यादी जाहीर केली.
Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police Commissioner Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. याअंतर्गत पोलिस आयुक्तालय या गटात नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात नंबरवन ठरलं आहे.

राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबवण्यात आलेल्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमाचे निकाल काल प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: 'एक्स'वरून या विजेत्यांची यादी जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या कडक मूल्यमापनात पोलिस आयुक्तालय या संवर्गात नाशिक पोलिस आयुक्तालयाने बाजी मारली आहे. राज्यातील पोलिस आयुक्तालयांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयाची कामगिरी सर्वोत्कृष्ठ ठरली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्तालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे. २०० पैकी १५६.२५ इतके गुण मिळवून नाशिक पोलिस आयुक्तालय नंबर वन ठरले आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून दिलगिरी..पण प्रकाश आंबेडकर म्हणतात पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल..वाद आणखी वाढला

याचे श्रेय अर्थातच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना व त्यांच्या टीमला जाते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये राबवलेली कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीमेची देखील सर्व राज्यभर चर्चा झाली. या मोहिमेअंतर्गत संघटित गुन्हेगारी टोळ्या, खंडणी जाळी तसेच राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांविरोधात समन्वित व ठोस कारवाई करण्यात आली. या दृष्टिकोनाला महाराष्ट्रभर अभूतपूर्व जनसमर्थन व व्यापक दखल मिळाली आणि त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी ही मोहीम अनुकरणीय म्हणून स्वीकारली.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Sanjay Raut : मंत्र्यांनी नाक घासलय, आता फार विषय ताणू नका ; गिरीश महाजन प्रकरणात संजय राऊतांची उडी, 'त्या' महिलेचं केलं कौतुक

नाशिक पोलिस आयुक्तालयानंतर दुसऱ्या स्थानावर ठाणे पोलिस आयुक्तालय तर नागपूर पोलिस आयुक्तालय तिसऱ्या क्रंमाकाची कामगिरी करणारे कार्यालये ठरले आहे. काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केले. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कार्यालयाची निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे अभिनंदन केले.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:

- जिल्हाधिकारी कार्यालय - जळगाव

- पोलिस अधीक्षक कार्यालय - ठाणे ग्रामीण

- महानगरपालिका - पनवेल

- पोलिस आयुक्त कार्यालय - नाशिक

- विभागीय आयुक्त कार्यालय - नागपूर

- पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय - नांदेड

- राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय - संचालक, तंत्र शिक्षण

- राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण - महाराष्ट्र सागरी मंडळ

- मंत्रालयीन विभाग - सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरून या विजेत्यांचे अभिनंदन केले. "या सर्व कार्यालयांच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या चमूने उल्लेखनीय काम केले आहे. राज्य शासनातर्फे या सर्व विजेत्यांचा लवकरच गौरव करण्यात येईल," असे त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com