Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपला गडाला सुरुंग; डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात प्रवेश करणार?

राज्यातील सत्तांतरानंतर राज्यभरातून शिंदे गट आणि भाजपात जोरदार इमकमिंग सुरु आहे.
Nashik Politics :
Nashik Politics :Twitter@Dr.Advay Hiray

Nashik News : राज्यातील सत्तांतरानंतर राज्यभरातून शिंदे गट आणि भाजपात जोरदार इमकमिंग सुरु आहे. असे असतानाच दुसरीकडे नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे (Dr. Advay Hiray) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (२२ जानेवारी) त्यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

अद्वय हिरे यांच्यामुळे मालेगावमध्ये भाजपला मोठी ताकद मिळाली होती. पण पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणूनही हिरे यांच्याकडे पाहिले जाते. पण जुन २०२२मध्ये शिवसेनेत फुट पडली आणि महाआघाडी सरकार कोसळले. त्यामुळे तालुक्यातील भाजप आणि मूळ सेनेतील दुरावा संपला. पण हे राजकीय समीकरण भाजपसाठी हिताचे नव्हते.

Nashik Politics :
Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी नांदी; ठाकरे गट - वंचित युतीची अधिकृत घोषणा

दरम्यान, काही दिवसांपुर्वी मालेगावमध्ये झालेल्या आंदोलना संदर्भात अद्वय हिरे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही कळवले होते. मात्र पक्षाने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. याशिवाय दादा भुसे यांनीदेखील शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व पाहता मालेगावमध्ये भाजपचे स्थान कमी होत असल्याने अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

डॉ. हिरे यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत दादा भुसे विरुद्ध हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात आगामी काळात निवडणूका होणार आहेत पण त्यापुर्वीच डॉ. हिरे यांनी आहेत, भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे, भुसे यांची हकालपट्टी करण्यासाठी डॉ. हिरे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पत्रही लिहले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्यानेच त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हिरे आता ठाकरे छावणीत गेल्याने, महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी मालेगाव आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com